ALERT : अधिक चिकन खाल्ल्याने फर्टिलिटी रेट होतो कमी !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2017 06:11 AM2017-03-31T06:11:04+5:302017-03-31T11:41:04+5:30
याचा सर्वात धोकेदायक परिणाम म्हणजे महिलांमध्ये फर्टिलिटी रेट कमी होणे म्हणजेच गर्भधारण होण्याची शक्यता कमी होते.
Next
धावपळीच्या आयुष्यात हेल्दी राहण्यासाठी आणि अधिकाधिक पोषक-तत्त्वांचे सेवन करण्यासाठी बरेचजण शाकाहारी पेक्षा मांसाहाराचे सेवन करतात. मात्र एका संशोधनानुसार मांसाहाराच्या अति सेवनाने बऱ्याच आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, हे सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे मांसाहाराच्या सेवनाने फर्टिलिटी रेट कमी होण्यासारख्या समस्याही उद्भवू शकतात.
सध्या प्राणांना आॅक्सिटोसिनचे इंजेक्शन देऊन लवकर मोठे आणि लठ्ठ केले जाते. आणि ज्या प्राण्यांचा वापर मांसाहारासाठी केला जातो, त्या प्राण्यांना तर हे इंजेक्शन अवश्य दिले जाते. अशा प्राण्यांचे मांस खाल्लयाने शरीरात कित्येक व्याधी निर्माण होतात. मात्र याचा सर्वात धोकेदायक परिणाम म्हणजे महिलांमध्ये फर्टिलिटी रेट कमी होणे होय. म्हणजेच महिलांमध्ये गर्भधारण होण्याची शक्यता कमी होते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा जेव्हा आपण चिकनाचे सेवन करता, तेव्हा थोडथोड्या प्रमाणात आॅक्सिटोसिनचे सेवन करत असतो. ज्यामुळे आपले डीएन आणि हार्मोन्स बॅलेन्स असंतुलित होतो. ज्यामुळे लोकांमध्ये फर्टिलिटी रेट कमी होण्याची समस्या वाढत आहे.
या कारणाने होते असे
विशेषत: बहुतेक लोक मांस कोंबड्याचे सेवन करतात, ज्याचे लिंग नर आहे. रोज कोंबड्याचे मांस सेवन केल्याने महिलांमध्ये नर हार्मोन्सचे सेवन वाढते. यामुळे तिच्या शरीरातील सर्व हार्मोन्सचे संतुलन बिघडते, यामुळेच महिलांचे मातृत्व म्हणजेच तिचे स्वाभाविक गुण धोक्यात येतात.
काय कराल उपाय
आपण त्वरीत चिकन खाणे बंद करावे. जर खायाचेच असेल तर आॅर्गेनिक पोल्ट्रि फॉर्ममधून चिकन घेऊन खावे. फळ आणि हिरव्या भाजीपालांचे सेवन अधिक करावे. कपालभाति प्राणायाम केल्यास अधिक फायदेशिर ठरते.