Alert : वीज अंगावर पडू नये म्हणून अशी घ्या काळजी !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2017 12:22 PM2017-05-16T12:22:08+5:302017-05-16T17:54:10+5:30

अवकाळी पाऊस म्हटला की, आकाशात विजांचा कळकळाट आलाच. त्यातच दरवर्षी वीज कोसळण्याचे प्रकार घडतात आणि अंगावर वीज पडून असंख्य लोक मृत्युमुखी पडतात.

Alert: Take care that electricity should not fall on you! | Alert : वीज अंगावर पडू नये म्हणून अशी घ्या काळजी !

Alert : वीज अंगावर पडू नये म्हणून अशी घ्या काळजी !

Next
ong>-Ravindra More
अवकाळी पाऊस म्हटला की, आकाशात विजांचा कळकळाट आलाच. त्यातच दरवर्षी वीज कोसळण्याचे प्रकार घडतात आणि अंगावर वीज पडून असंख्य लोक मृत्युमुखी पडतात. या काळात सतर्क राहण्याचे आवाहन नेहमी संबंधित जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे  करण्यात येते, मात्र तरीही आपणाकडुन कळत-नकळत होणाऱ्या चुकांमुळे या आसमानी संकटामुळे बऱ्याचजणांना जीव गमवावा लागतो. आज आम्ही आपणास वीज अंगावर पडू नये म्हणून काय दक्षता घ्यावी याबाबत माहिती देत आहोत. 

पाऊस सुरु होण्याच्या अगोदर आकाशात ढग जमा होतात आणि गडगडाटीसह वादळी वारा सुरू होतो. यादरम्यानच आकाशात विजा चमकतात आणि मोठ्या आवाजासह कुठेतरी जमिनीवर पडतात. 

सध्या शेतीपूर्व मशागतीची कामे सुरु झाली असून शेतात काम करणारे शेतकरी, मजूर आणि पशूधन यांना या विजांपासून धोका निर्माण होऊ शकतो. बऱ्याचदा आपण विजेपासून बचावासाठी झाडाचा आश्रय घेतो, मात्र उंच झाड हे कोसळणाऱ्या विजेला आकर्षित करतात त्यामुळे झाडाखाली आश्रय कोणत्याही परिस्थितीत घेवू नये. अवकाळी पाऊस आणि गडगडाच्या कालावधीत  कोसळणारी वीज ही उंच वस्तूवर, ठिकाणावर कोसळते आणि धातूच्या वस्तूवर जास्त आकर्षित होते. त्यामुळे अशा वातावरणात उंच ठिकाणी जाण्याचे टाळावे. तात्काळ मोकळया जागेवर यावे आणि दोन्ही पाय गुडघ्याजवळ घेऊन त्यांना दोन्ही हातानी आवळुन ठेवावे तथा हनवटी जवळ घेतलेल्या गुडघ्यांवर टेकवावी. सर्वात जास्त धोका झाडाखाली थांबल्यामुळे उद्भवतो ज्यांच्या फांदया छोटया व दूरपर्यंत पसरलेल्या असतात. निर्जन ठिकाणी विखुरलेले झाडांचे समुह विजेला आकर्षित करतात. झाडाच्या जवळ किंवा खाली उभे राहिल्यामुळे मनुष्याला अशा प्रकारे ईजा होण्याची, दगावण्याची शक्यता असते. तसेच धातुंच्या वस्तू जसे छत्री, चाकु, गोल्फ खेळावयाची छडी, भांडे विशेषत: हे जर का शरीराच्या वरच्या बाजुला असल्यास विजा चमकत असताना दूर ठेवाव्यात.   

विजा चमकत असताना मोबाइल, इंटरनेट जोडणी असलेले संगणक, टिव्ही, दुरध्वनी यांचा वापर करु नये, वीज यामुळे आकर्षित होवू शकते. तसेच विजा चमकत असताना विद्युत प्लगमध्ये हेयरडायर, विद्युत टुथब्रश, विद्युत रेझर आदी कोणत्याही ईलेक्ट्रॉनिक वस्तूची जोडणी देण्यात येवू नये. असे केल्यास आपल्या घरावर वीज कोसळली तर त्यातील प्रभार प्लगच्या माध्यमातून विद्युत प्लगमध्ये येवू शकते आणि घराचे नुकसान होऊ शकते आणि पर्यायी आपल्या जिवीतासही धोका निर्माण होऊ शकतो. 

आपण जर चारचाकी वाहनात असाल आणि विजा कडाडत असतील तर अशावेळी वाहनातून बाहेर येऊ नये. कारण चारचाकी वाहन हे विजेपासून सुरक्षित ठेवणारे साधन आहे. विजा चमकत असताना छत्री, धातुंची भांडी आदी धातुंच्या वस्तू घेवून बाहेर जावू नये. शिवाय या दरम्यान पाण्यातही अजिबात थांबू नये. पाण्यात असाल तर त्वरीत बाहेर यावे. विजा चमकत असतांना विद्युत प्रभार जाणविल्यास अंगावरील केस उभे राहतात किंवा त्वचेला मुंग्या, झिणझिण्या आल्यासारखे वाटते. तेव्हा समजून घ्यावे की, वीज आपल्यावर पडणार आहे यावेळी त्वरीत जमिनीवर बसलेल्या मुद्रेत जावे. तसेच जवळपास इमारत असल्यास त्वरित इमारतीचा आश्रय घ्यावा, कारण इमारत सुरक्षित आसरा ठरते. जर इमारत उपलब्ध नसल्यास गुंफा, कपार यांचा आश्रय घ्या. अशा परिस्थितीत हे सुरक्षित ठिकाण ठरतात. सुरक्षीत आश्रय उपलब्ध झालेच नाही तर उंचीच्या वस्तुंखाली आश्रय घेवू नका.  

Web Title: Alert: Take care that electricity should not fall on you!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.