ALERT : जेवताना टीव्ही पाहणे आरोग्यासाठी हानिकारक !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2017 06:50 AM2017-02-21T06:50:43+5:302017-02-21T12:20:43+5:30

जेवण करताना आपणासही टीव्ही पाहण्याची सवय असेल तर वेळीच सतर्क व्हा, कारण ही सवय आरोग्यासाठी हानिकारण असल्याचे संशोधनात निष्पन्न झाले आहे.

ALERT: Watch TV while eating food is harmful to health! | ALERT : जेवताना टीव्ही पाहणे आरोग्यासाठी हानिकारक !

ALERT : जेवताना टीव्ही पाहणे आरोग्यासाठी हानिकारक !

googlenewsNext
वण करताना आपणासही टीव्ही पाहण्याची सवय असेल तर वेळीच सतर्क व्हा, कारण ही सवय आरोग्यासाठी हानिकारण असल्याचे संशोधनात निष्पन्न झाले आहे. आजच्या सदरात नेमके जेवताना टीव्ही पाहण्याचे आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात याबाबत जाणून घेऊया.   

* टीव्ही पाहताना लोक एवढे मग्न होतात की त्यांना समजतही नाही की, ते किती प्रमाणात खात आहेत ते. अशातच ते एवढे जेवण करुन घेतात की त्यांना पोटाच्या तक्रारी सुरू होतात. 

* टीव्ही पाहताना आपला मेंदूचे जेवणाकडे लक्ष नसते ज्याकारणाने पचनसंस्था बिघडते. विशेष म्हणजे ही सवय जर आपणास रात्रीला असेल तर त्वरित बदला, कारण असे केल्याने याचा परिणाम झोपेवर होतो.

* टीव्ही पाहताना मेटाबॉलिज्मची प्रकिया मंद होते ज्यामुळे शरीरात फॅट एकत्र जमा होऊन लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. 

* एका संशोधनात असेही आढळले आहे की, टीव्ही पाहताना जेव्हा एखादी जाहीरात येते तेव्हा खाण्याची इच्छा तीव्र होत असते. याकारणाने थोड-थोड्या वेळाने भूक लागते. 

* टीव्ही पाहतेवेळी जेवण केल्याने आपण जेवणाचा आनंद घेऊ शकत नाही. यामुळे कोणत्याही खाद्यपदार्थाचा स्वादही समजत नाही.

Web Title: ALERT: Watch TV while eating food is harmful to health!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.