ALERT : आपण धुम्रपान करताय! तर आपल्यासाठी या आठ गोष्टी आहेत महत्त्वाच्या !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2017 10:56 AM2017-02-03T10:56:41+5:302017-02-03T17:23:12+5:30
सिगारेट जळाल्यानंतर त्यातून ७ हजारापेक्षा जास्त रसायने निघतात. त्यापैकी ६९ तर एवढे हानिकारक रसायने असतात जे कॅन्सरची शक्यता वाढवितात.
Next
अमेरिकन लंग असोसिएशनतर्फे नुकताच करण्यात आलेल्या संशोधनानुसार सिगारेट जळाल्यानंतर त्यातून ७ हजारापेक्षा जास्त रसायने निघतात. त्यापैकी ६९ तर एवढे हानिकारक रसायने असतात जे कॅन्सरची शक्यता वाढवितात. ही रसायने शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर परिणाम करुन आरोग्याला हानी पोहोचवतात. छातीच्या आजारांच्या तज्ज्ञांनुसार धुम्रपानामुळे शरीरावर आठ प्रकारे नुकसान होत असते.
१. रक्ताभिसरण प्रक्रिया
- सिगारेटच्या धुराचा शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होऊन ही प्रक्रिया मंदावते. त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता सुमारे ५१ टक्के वाढते.
२. मेंदू
- संशोधनानुसार सिगारेट ओढल्याने मेंदुतील कॉर्टेक्सचा भाग पातळ होतो. यामुळे मेंदूची क्षमता कमी होऊ लागते.
३. ह्रदय
- नियमित सिगरेट ओढल्याने उच्च रक्तदाब वाढतो, ज्यामुळे स्ट्रोक आणि ह्रदय विकाराचा धोका निर्माण होतो.
४. यकृत
- नियमित सिगरेट ओढल्याने यकृत मध्ये टार जमा होतो, त्यामुळे यकृतचा कॅन्सर वाढण्याची ९० टक्के शक्यता वाढते.
५. तोंड
- धुरात असलेल्या रसायनांमुळे तोंडातील लाळ कोरडी होते शिवाय दातांसंबंधी समस्या निर्माण होतात. यामुळे तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता बळावते.
६. डोळे
- सिगरेटमधील तंबाखूत कित्येक आॅक्सिडेंट्स असतात ज्याचा डोळ्यांवर विपरित परिणाम होतो. यामुळे डोळ्यांचे तेज कमी होणे, मोतीबिंदू, मॅक्युलर डिजनरेशन आणि आॅप्टिक न्युरोपॅथी सारख्या समस्या निर्माण होतात.
७. हाडे
- यातील निकोटीन शरीरातील अॅस्ट्रोजन हार्मोन्सचा परिणाम कमी करतात. त्यामुळे हाडे ठिसूळ होऊन हाडांंच्या समस्या निर्माण होतात.
८. डी.एन.ए.
- सिगारेटमध्ये फेनानथरेन नावाचा घटक असतो जो रक्तात मिसळतो आणि डी.एन.ए.ला हानी पोहोचवतो. ज्यामुळे कॅन्सरची शक्यता बळावते.
Also Read : धुम्रपानामुळे मी वडिलांना गमावले !
* काय उपाय कराल-
* पालक
- आपल्या नियमित आहारात पालकचा समावेश करा. यातील फॉलिक अॅसिड आणि विटॅमिन बी ९ शरीरील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यात मदत करतात.
* संत्री
- दिवसभरातून नियमित एक किंवा दोन संत्री खा किंवा एक ग्लास संत्रीचा ज्यूस प्या. यातील विटॅमिन ‘सी’ शरीरातील निकोटिन बाहेर काढते.
* निंबू
- निंबूमध्ये पुरेशा प्रमाणात विटॅमिन ‘सी’ असते जे निकोटिन बाहेर काढण्यास मदत करते. यासाठी रोज सकाळी नियमित अनाशापोटी एका निंबूचा रस प्या.
* गाजराचा रस
- नियमित गाजराचा रस प्या. यातील अॅन्टिआॅक्सिडेंट्स शरीरातील निकोटिन बाहेर काढण्यास मदत करते.
* ब्रोकोली (फुलभाजी)
- आहारात ब्रोकोलीचा समावेश करावा, यातील विटॅमिन ‘बी’, ‘बी५’ आणि ‘सी’ शरीरातील निकोटिन बाहेर काढण्यास मदत करते.
* काकडी
- आहारात नियमित काकडीचा समावेश असावा. यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि निकोटिन बाहेर पडण्यास मदत होते.
* आले
- नियमित एक कप पाण्यात आल्याचा तुकडा गरम करुन प्या. यातील अॅन्टिआॅक्सिडेंट्स निकोटिन बाहेर काढण्यास मदत करते.
* कोशिंबीर
- आहारात नियमित कोशिंबिरीचा समावेश करावा. यात फायबर भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे निकोटिन बाहेर टाकण्यास मदत होते.
* पाणी
- दिवसभरातून किमान १० ते १२ ग्लास पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते.
* अंकुरित कडधान्य (स्प्राउट्स)
- रोजच्या ब्रेकफास्टमध्ये अंकुरीत कडधान्याचा समावेश करावा. यात समावेश असलेल्या फायबरमुळे शरीरातील निकोटिन बाहेर पडण्यास मदत होते.