वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे अॅल्युलोज...जाणून घ्या साखर आणि यात काय फरक आहे ते
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 07:36 PM2021-05-14T19:36:39+5:302021-05-14T19:37:40+5:30
अॅल्युलोज एकाप्रकारची साखर असते जी फळांमध्ये असते. याच वैज्ञानिक नाव सुक्रोझ असे असते. यामध्ये कॅलरीज अगदीच कमी असतात. अॅल्युलोजमुळे वजन कमी राहते सोबत डायबेटीज, हार्ट प्रॉब्लेमवरही नियंत्रण राहते.
साखरेचं खाणार त्याला देव देणार ही म्हण आपण ऐकली असेलच पण सध्या साखरेचं खाणार त्याच वजन वाढणार असंच चित्र आहे. पण तुम्हाला आम्ही एका अशा गोष्टीबद्दल सांगणार आहोत जी गोड तर आहेच पण त्याचबरोबर यात कॅलरी अजिबात नाही.
गोड म्हणजे अनेक खव्वयादर्दींचा विकपॉईंट. पण डायबेटीज, ब्लड प्रेशर, हार्टचा त्रास असणाऱ्या खव्वयांसाठी गोड खाणे दुरापास्तच. म्हणूनच की काय, साखरेचं सेवन करण्याची इच्छा याच प्रकारातल्या खव्व्ययांना जास्त होते.
तुम्ही वजन कमी करत असाल तर साखर खाण्याचा प्रश्नच येतं नाही. कारण साखर म्हणजे कॅलरीज आणि कॅलरीजचं अतिप्रमाण म्हणजे लठ्ठपणा आणि पर्यायाने अनेक रोगांना आमंत्रण.
आता आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत ते ऐकल्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही की असं काही घडू शकतं. अहो होच!
तरं असं आहे की तुम्ही अगदी भरपूर गोड खाऊ शकता पण तुम्हाला काहीही त्रास होणार नाही.
कसं शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. पण हि किमया आहे अॅल्युलोज या घटकाची. साखरेइतकाच गोड पण कॅलरीज साखरेपेक्षाही कमी. तुम्ही एल्यूलोज असलेले पदार्थ खाऊन गोड खाण्यावर ताबाही मिळवू शकता.
काय आहे अॅल्युलोज?
अॅल्युलोज एकाप्रकारची साखर असते जी फळांमध्ये असते. याच वैज्ञानिक नाव सुक्रोझ असे असते. यामध्ये कॅलरीज अगदीच कमी असतात. अॅल्युलोजमुळे वजन कमी राहते सोबत डायबेटीज, हार्ट प्रॉब्लेमवरही नियंत्रण राहते.
आता अॅल्युलोजचे फायदे पाहु
वजन कमी करणे
वजन कमी करणाऱ्यांनो तुम्हाला गोड खायची इच्छा होत असेल तर बिनधास्त अॅल्युलोजपासून बनवलेले पदार्थ खा. तुमचं वजन तर नियंत्रणात राहिलच पण वाढणारही नाही. यात कॅलरीज कमी असल्याने तुमच्या शरीरातील कॅलरीज नियंत्रणातच राहतील.
डायबेटीजच्या रुग्णांना फायदेशीर
मधुमेहाच्या रुग्णांसाठी अॅल्युलोज भरपूर महत्वाचे आहे. यामुळे ब्लड शुगर लेवल नियंत्रणात राहते आणि तुम्हाला गोड खायचा आनंदही मिळतो. डायबेटीज असलेल्या रुग्णांना डॉक्टर कमी प्रमाणात गोड खाण्याचा सल्ला देतात. त्यावर अॅल्युलोजचे कमी प्रमाणातील सेवन लाभदायक ठरू शकते.
हार्ट प्रोब्लेम
अॅल्युलोजमुळे आपले स्वास्थ्यही उत्तम राहते. हार्ट प्रोब्लेम असणाऱ्या रुग्णांनी अॅल्युलोजचे सेवन केल्यास त्यांचे हृदयाचे कार्य चांगले राहते. कुठल्याही प्रकारचा धोका उद्भवत नाही.
((टिप - वरील माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून कोणताही दावा केलेला नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.))