बदाम-अक्रोड भिजवून खाल्ले नाही तर पोटात भरेल 'विष'? डॉक्टरांनी दिला खास सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 11:20 AM2024-02-17T11:20:41+5:302024-02-17T11:21:31+5:30
बरेच लोक असं मानतात की, बदाम आणि अक्रोडच्या सालींमध्ये विषारी तत्व असतात.
बदाम आणि अक्रोड जगभरातील लोक आवडीने खातात. यांचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. हे पौष्टिक आणि स्वादिष्ट असतात. हे दोन्ही ड्राय फ्रूट्स टणक सालीसोबत येतात. साल काढूनच बदाम आणि अक्रोड खाल्ले जातात.
बरेच लोक असं मानतात की, बदाम आणि अक्रोडच्या सालींमध्ये विषारी तत्व असतात. आणि यांच्या सेवनाने शरीराला गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. कदाचित हेच कारण आहे की, अनेक एक्सपर्ट बदाम आणि अक्रोड भिजवून आणि त्यांची साल काढून खाण्याचा सल्ला देतात.
पण प्रश्न हा आहे की, खरंच बदाम आणि अक्रोडच्या सालींमध्ये विषारी तत्व असतात का? याबाबत न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर प्रियंका सहरावत यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात किती तथ्य आहे यावर त्यांनी माहिती दिली आहे. तसेच बदाम आणि अक्रोड खाण्याची योग्य पद्धतही सांगितली आहे.
बदाम-अक्रोडच्या सालीत विषारी तत्व असतात का?
डॉक्टरांनुसार, बरेच लोक असं मानतात की, बदाम आणि अक्रोडच्या सालीमध्ये विष असतं आणि ते कच्चे खाणं टाळलं पाहिजे. डॉक्टरांनी सांगितलं की, यांच्या सालीमध्ये विष नसतं. उलट एक फायदेशीर तत्व असतं ज्याला फायटिक अॅसिड (Phytic acid) म्हटलं जातं.
फायटिक अॅसिड (Phytic acid) काय आहे?
फायटिक अॅसिड एक तत्व आहे. बदाम आणि अक्रोडमध्ये आढळणारं हे तत्व आहे जे त्यांना पर्यावरणापासून होणाऱ्या नुकसानपासून वाचवतं. पण मनुष्यांसाठी हे विषासारखं काम करतं.
बदाम भिजवून खाणं म्हणजे विष कमी करणं नाही
बदाम किंवा अक्रोड भिजवून खाण्याचा अर्थ असा अजिबात नाही की, असं केल्याने सालीमधील टॉक्सीन निघून गेलं. असं करण्याचा एकच अर्थ होतो की, फायटिक अॅसिडचं प्रमाण कमी करणं.
बदाम आणि अक्रोड खाण्याची योग्य पद्धत
फायटिक अॅसिड शरीरातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सच्या अवशोषणाला बाधित करतं. हेच कारण आहे या गोष्टी नेहमी भिजवून सकाली खाण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून त्याचं प्रमाण कमी व्हावं.
भिजवलेले बदाम न खाण्याचे नुकसान
डॉक्टरांनी सांगितलं की, जर तुम्ही भिजवलेले बदाम खात नसाल तर यात आढळणारं फायटिक अॅसिड शरीरात विषासारखं काम करेल. यामुळे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचं अवशोषण होणार नाही.