बदामाचे फायदे तुम्हाला माहीत असतीलच आता नुकसान वाचा, जाणून घ्या एका दिवसात किती बदाम खावेत..
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 11:16 AM2022-06-30T11:16:41+5:302022-06-30T11:16:54+5:30
Almonds Side Effects: बदामाचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीराचं वजन वाढू शकतं. अजूनही काही नुकसान आहेत जे खालीलप्रमाणे सांगता येतील.
Almonds Side Effects: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी बदाम फारच हेल्दी मानले जातात. तेच योग्य प्रमाणात बदामाचं सेवन केल्याने वजन कमी करण्यासोबतच इम्यूनिटी बूस्ट करण्यासारखे अनेक फायदे मिळतात. पण जर तुम्ही याचं सेवन जास्त प्रमाणात करत असाल तर याने फायदा होण्याऐवजी नुकसान जास्त होईल. बदामाचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीराचं वजन वाढू शकतं. अजूनही काही नुकसान आहेत जे खालीलप्रमाणे सांगता येतील.
वजन वाढतं
28 ग्रॅम बदामात जवळपास 164 कॅलरीज असतात. अशात जर तुम्ही नेहमीच्या आहारासोबत बदामाचा जास्त सेवन करत असाल तर याने तुमच्या शरीराचं वजन वाढू शकतं. त्यामुळे प्रयत्न करा की, दिवसभरात तुम्ही केवळ 5 ते 6 बदामच खाल.
बद्धकोष्टतेची समस्या
बदामात फायबर भरपूर प्रमाणात असतं. फायबर आरोग्यासाठी चांगलं असतं, पण जास्त फायबरही आरोग्यासाठी नुकसानकारक होऊ शकतं. त्यामुळे बदाम जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात. यामुळे जुलाब, पोटात सूज आणि पोट कडक होणे अशा समस्या होऊ शकतात.
किडनी स्टोनचा धोका
बदामात भरपूर प्रमाणात ऑक्सालेट असतात. शरीरात जास्त प्रमाणात ऑक्सीलेट झाले तर किडनी स्टोन होण्याचा धोका जास्त वाढतो. त्यामुळेच बदामाचं कमी प्रमाणात सेवन करा.
अॅलर्जीची समस्या
बदाम किंवा नट्सच्या सेवनाने काही लोकांना अॅलर्जीची समस्या होऊ शकते. जर तुम्हाला नट्सची अॅलर्जी आहे तर बदामाचं सेवन करणं टाळा. काही लोकांना बदामाचं सेवन केल्याने ओरल अॅलर्जी सिंड्रोमची समस्या होऊ शकते. अशात घशात खवखव, ओठांवर सूज येण्याची समस्या होऊ शकते.