'हे' फळं म्हणजे 'या' गंभीर आजारांवर रामबाण, फायदे समजले तर रोज खाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 11:29 AM2022-06-06T11:29:11+5:302022-06-06T11:57:09+5:30
अपचन, डायबिटीस, हाडांचा ठिसुळपणा यावर आलु बुखार रामबाण आहे. चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया काय आहेत आलुबुखारचे फायदे?
उन्हाळ्यात मिळणारे आंबटगोड चवीचे आलु बुखार हे फळ अनेकांना आवडते. हे फळ उन्हाळ्यातच मिळत असल्याने त्याचे विशेष महत्त्व आहे. हे चवीला जितके उत्तम लागते त्याहीपेक्षा कैक पटीने याचे फायदे आहेत. अपचन, डायबिटीस, हाडांचा ठिसुळपणा यावर आलु बुखार रामबाण आहे. चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया काय आहेत आलुबुखारचे फायदे?
बद्धकोष्ठतेच्या समस्येवर फायद्याचे
आलुबुखार हे फळ बद्धकोष्ठतेच्या समस्येवर अत्यंत लाभदायी आहे. या फळात फायबर जास्त असल्याने बद्धकोष्ठता दूर होते. यात सुमारे १ ग्रॅम फायबर असते जे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी रोज आलुबुखारचे फळ खावे.
डायबिटीसचा धोका कमी होतो
आलुबुखारमुळे शरीरातील शुगर कमी होते. यातील फायबर साखरेला रक्तात विरगळण्यापासुन बचाव करते. तसेच यात अॅडिनो पॅक्टिन नावाचे घटक असते. हे स्वत्रवल्यामुळे शरीरातील शुगर लेव्हल कमी होते.
हाडांसाठी अत्यंत फायदेशीर आहे
ऑस्टिओपॅरसिस सारख्या आजारांमध्ये आलु बुखारचा फार फायदा होतो. ऑस्टिओपॅरसिस सारख्या आजारांमध्ये हाडं ठिसुळ होतात अशावेळी आलुबुखारचा फायदा होतो. हाडं मजबुत होतात.
हृदयासाठी अत्यंत फायदेशीर
आलुबुखारमुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो आणि बॅड कोलेस्ट्रॉलही कमी होते. त्यामुळे हृदय विकार, हार्ट स्ट्रोकचा धोका टळतो. ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी आलु बुखारचे सेवन रोज करावे.