Alopecia Areata: 'या' आजारामुळे कमी वयातच वेगानं गळतात केस; वाचा दाट, काळ्याभोर केसांसाठी सोपा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 02:08 PM2021-04-05T14:08:42+5:302021-04-05T14:17:14+5:30

Alopecia Areata : या रोगाचे कारण अद्याप समजू शकले नाही, परंतु याला अनुवांशिक रोग देखील मानले जाते.

Alopecia Areata: Alopecia areata a disease that causes unpredictable hair loss has no cure yet | Alopecia Areata: 'या' आजारामुळे कमी वयातच वेगानं गळतात केस; वाचा दाट, काळ्याभोर केसांसाठी सोपा उपाय

Alopecia Areata: 'या' आजारामुळे कमी वयातच वेगानं गळतात केस; वाचा दाट, काळ्याभोर केसांसाठी सोपा उपाय

googlenewsNext

हेयर एक्सपर्ट्सच्या मते जर एखाद्या व्यक्तीचे दिवसाला  १०० केस जरी गळत असतील तरि घाबरण्याचं काहीही कारण नाही. कारण जेव्हा आपले जुने केस गळतात तेव्हाच नवीन केस वेगानं वाढायला सुरूवात होते. पण जर तुमचे केस वेगानं आणि अतिप्रमाणात  गळत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करायला हवेत.  

एलोपीसिया एरेटा (Alopecia Areata) हा एक असा आजार आहे.  ज्या आजारात अप्रत्यक्षरित्या केस गळतात. अनेकदा एखाद्या डोक्याच्या खास स्पॉटवरून केस जास्तीत जास्त गळायला सुरूवात होते. आज आम्ही तुम्हाला या आजारापासून बचाव कसा करता येईल याबाबत सांगणार आहोत. 

या कारणांमुळे उद्भवतो एलोपिसियाचा आजार

एलोपिसिया एरेटा एक ऑटोइम्यून(Autoimmune Disease) आजार आहे. यात शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती आणि पांढऱ्या रक्ताच्या पेशी, ज्यांचे काम आजारांशी लढण्याचे असते. अशा पेशी हेयर फॉलिक्स (Hair Follicles)वर हल्ला करतात. त्यामुळे केस वेगानं गळायला सुरूवात होते. 

या रोगाचे कारण अद्याप समजू शकले नाही, परंतु याला अनुवांशिक रोग देखील मानले जाते. आपल्या  कुटुंबातील सदस्याकडून हा आजार होण्याचा धोका जास्त असतो. याशिवाय जास्त ताण घेतल्यामुळे हा आजार देखील उद्भवू शकतो.

अमेरिकेची आरोग्य वेबसाइट मेडिकल न्यूज टुडे. कॉमच्या माहितीनुसार, एलोपीसियावर सध्या कोणताही उपचार नाही. तथापि, काही पद्धती केसांना पुन्हा चांगलं बनविण्यात मदत करू शकतात. अलोपिसीयाचे बहुतेक रूग्ण अरोमाथेरपी, एक्यूपंक्चर, प्रोबायोटिक्स, झिंक आणि बायोटिनसारखे जीवनसत्त्वे यासह नैसर्गिक उपचारांना प्राधान्य देतात. या व्यतिरिक्त काही घरगुती औषधोपचारदेखील करता येतात.

कांद्याचा रस-

कांद्यात सल्फर असते ज्यामुळे नवीन केस वेगानं वाढतात आणि केस गळण्यासाठी कारणीभूत ठरत असलेल्या अशा फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते कांद्याचा रस. कांद्याचा रस हलक्या हाताने चोळा आणि टाळूमध्ये मालिश करा.

लसणाचा रस-

कांद्याप्रमाणे लसूणमध्येही सल्फर, तसेच झिंक आणि कॅल्शियम असते, ज्यामुळे केसांची वाढ होते आणि खालच्या आजारांवर उपचार करण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, हे टाळूतील रक्ताचा प्रवाह देखील वाढवते.

मेथीची पेस्ट

मेथीला रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी मेथी बारीक करून त्यात नारळ तेल मिसळा आणि केसांना ही पेस्ट लावा,  १ ते २ तास ही पेस्ट लावल्यानंतर केस धुवून टाका.  ब्रेस्ट कॅन्सरपासून बचावासाठी काय खायचं आणि काय खाऊ नये? वाचा आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला

बटाटा

केसांना सुंदर आणि काळेभोर  होण्यासाठी बटाटा उपयुक्त ठरत असतो.  ज्या लोकांना केस गळण्याची समस्या जाणवते अशा लोकांनी जर बटाट्याचा वापर केला तर  फायद्याचं ठरेल. त्यामुळे केसांची वाढ चांगली होईल. बटाट्यात असलेले व्हिटामीन सी आणि आर्यन, व्हिटमीन बी केसांना बळकटी देण्यासाठी फायदेशीर ठरतात.  तसंच याचा वापर केसांवर केल्यामुळे रक्तभिसरण व्यवस्थित होऊन  केस गळणं बंद होतं. 

गरोदरपणात हे पाच घटक गरजेचेच असतात. आईच्यासोबत गर्भाचीही असते हीच गरज!

सगळ्यात आधी एक मध्यम आकाराचा बटाटा घ्या, नंतर बटाटा किसून त्याचा रस गाळून घ्या. बटाट्याचा रस हाताने पिळून घेतला तरी चालेल. एका भांड्यात रस काढून कापसाने केसांच्या मुळांना लावा. संपूण डोक्याला हा रस लावून झाल्यानंतर २० मिनिट वाट पाहा. त्यानंतर केस धुवून टाका. चांगला रिजल्ट दिसण्यासाठी आठवड्यातून २ वेळा हा प्रयोग करा. 

Web Title: Alopecia Areata: Alopecia areata a disease that causes unpredictable hair loss has no cure yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.