'या' पदार्थांचे सेवन म्हणजे अल्झायमर रुग्णांसाठी कायमचा धोका, सामोरे जावे लागेल मृत्यूला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 12:36 PM2021-09-22T12:36:33+5:302021-09-22T12:40:02+5:30

डॉक्टर नेहमी मेंदूशी संबधीत आजारांशी निगडीत ट्रिगर करणाऱ्या वस्तूंना दूर ठेवण्याचा सल्ला देतात. यामध्ये अनेक खाद्यपर्दार्थांचा देखील समावेश आहे.

Alzheimer causes symptoms and remedies food Alzheimer patient's should avoid | 'या' पदार्थांचे सेवन म्हणजे अल्झायमर रुग्णांसाठी कायमचा धोका, सामोरे जावे लागेल मृत्यूला

'या' पदार्थांचे सेवन म्हणजे अल्झायमर रुग्णांसाठी कायमचा धोका, सामोरे जावे लागेल मृत्यूला

Next

कोणताही व्यक्ती जेव्हा त्याच्या आहारात चुकीच्या खाद्यपर्थांचा समावेश करतो तर यामुळे डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखे न्यूरोट्रांसमीटर्सच्या बॅलेंसवर प्रभाव होतो. एका अभ्यासानूसार, हाय शूगर आणि सॅटुरेटेड फॅट युक्त डाएट व्यक्तीच्या हिप्पोकॅंपस (एक जटील ब्रेन स्ट्रक्चर) बिहेवियरला बदलते. यामुळे डॉक्टर नेहमी मेंदूशी संबधीत आजारांशी निगडीत ट्रिगर करणाऱ्या वस्तूंना दूर ठेवण्याचा सल्ला देतात. यामध्ये अनेक खाद्यपर्दार्थांचा देखील समावेश आहे.

केक किंवा कुकीज-
केक,कुकीज क्रॅकर आणि कोल्ड ड्रिंक्ससारख्या हाय शुगर फुड आपल्या मेंदूच्या वेस्टलाइनसाठी अत्यंत धोकादायक असते. यासाठी एक्सपर्ट प्रोसेस्ड फूडमध्ये असणाऱ्या रिफाइन्ड शुगरला विशेषत कमी करण्याचा सल्ला दिला जातो. याजागी जर आरोग्यास लाभदायक फळांचे सेवन केल्यास व्यक्तीचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळते.

खारट पदार्थ –
चिप्स , पिज्जा ,कॅन सूपमध्ये जास्त प्रमाणात सोडियमची मात्रा आढळून येते यामुळे मेंदूमधील कोशिकांमध्ये असणाऱ्या टाऊ प्रोटीनच्या लेवलला हे पदार्थ अस्थिर करतात. टाऊ प्रोटीनचा वाढता स्तकर डेमेंशियाच्या आजारपणाला निमंत्रण देतात. यासाठी डॉक्टर नेहमी जास्त खारट पदार्थ खाणे टाळा असा संदेश देतात.

व्हाइट ब्रेड किंवा भात-
संशोधनानुसार, व्हाइट ब्रेड किंवा भाताचे सेवन केल्यास अल्जाइमरचा त्रास होऊ शकतो. ज्यांना अनुवांशिकतेने या पदार्थांची अ‍ॅलर्जी आहे त्यांना हा त्रास जास्त होतो.

Web Title: Alzheimer causes symptoms and remedies food Alzheimer patient's should avoid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.