Alzheimer's day: हळदीच्या मदतीने कमी होतो अल्झायमरचा धोका!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 10:25 AM2018-09-21T10:25:30+5:302018-09-21T10:25:35+5:30
हळदीचे आरोग्यासाठी वेगवेगळे फायदे होतात हे सर्वांनाच माहीत आहे. हळदीचा वापर अनेक आजार दूर करण्यासाठी केला जातो. रोज हळदीचे सेवन केल्याने शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात.
हळदीचे आरोग्यासाठी वेगवेगळे फायदे होतात हे सर्वांनाच माहीत आहे. हळदीचा वापर अनेक आजार दूर करण्यासाठी केला जातो. रोज हळदीचे सेवन केल्याने शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. रोज हळदीचे सेवन केल्याने तुमची स्मरणशक्ती चांगली होते आणि मूड ताजातवाणा होतो.
अल्झायमरला ठेवते दूर
हळदीमध्ये आढळणाऱ्य़ा 'करक्यूमिन' मध्ये खास गुण असतात. भारतात जिथे आहारातून करक्यूमिन घेतलं जातं तेथील वयोवृद्धांना अल्झायमरचा धोक कमी असतो. त्यांची स्मरणशक्तीही चांगली असते. (हे पण वाचा : काय आहे अल्झायमर आजार? जाणून घ्या संकेत आणि लक्षणे!)
रक्त शुद्ध करण्यासाठी हळद फायदेशीर
शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढणे आणि रक्त शुद्ध करण्यासाठी हळदीचं ज्यूस सर्वात चांगला पर्याय मानला जातो. हे तयार करण्यासाठी कच्च्या हळदीचा तुकडा किंवा पावडर, लिंबू आणि मीठ हवं. आधी अर्धा लिंबूचा रस काढा त्यात हळद आणि मीठ मिश्रित करा. आता या मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि याचं सेवन करा.
रक्तप्रवाह चांगला होतो
तज्ज्ञांनुसार, हळदीला ब्लड प्युरिफायर मानलं जातं. याने शरीरातील ब्लड सर्कुलेशन मजबूत होतं. हळदीच्या सेवनाने डायबिटीजचा धोकाही कमी होतो.