लिंबूच्या सालीचे हे आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 11:07 AM2018-05-24T11:07:18+5:302018-05-24T11:08:55+5:30

लिंबू पिळून केवळ त्याच्या रसाचाच वापर करतो. पण, तुम्हाला माहिती आहे का, लिंबूच्या रसाप्रमाणे लिंबूची सालही औषधी गुणधर्माची असते. 

Amazing benefits of lemon peels | लिंबूच्या सालीचे हे आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?

लिंबूच्या सालीचे हे आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?

googlenewsNext

आपल्या दररोजच्या अहारात वापरल्या जाणाऱ्या लिंबूचे औषधी गुणधर्म आपल्याला जवळपास माहीत असतात. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण लिंबूचा रोजच्या आहारात वापर करतात. पण, हा वापर करत असताना आपण लिंबू पिळून केवळ त्याच्या रसाचाच वापर करतो. पण, तुम्हाला माहिती आहे का, लिंबूच्या रसाप्रमाणे लिंबूची सालही औषधी गुणधर्माची असते. 

लिंबूच्या सालीमध्ये कॅल्शीयम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि फायबर यांचे उच्च गुणधर्म असतात. म्हणूच आज आम्ही तुम्हाला लिंबूच्या सालिबद्धलचे औषधी गुणधर्म सांगणार आहोत. जे तुमच्या सांधेदुखीवर फायदेशीर ठरू शकेल.

औषधी वापर करण्यासाठी लिंबूची साल काढताना लक्षात ठेवा की, लिंबूची केवळ पिवळी सालच काढा. आतला गर नको. या सालीचा लेप तयार करून शरीरावर ज्या ठिकाणी वेदना होतात अशा ठिकाणी लावा. हा लेप लावल्यावर त्या ठिकाणी एका कापडाने हलकेसे बांधून ठेवा. जेणेकरून, लेप हालणार नाही आणि खाली पडणार नाही. दोन तासानंतर हा लेप काढून टाका.

कसे बनवाल हा लेप?

एका काचेच्या भांड्या लिंबूच्या काढलेल्या साली घ्या. यात 3 ते 4 चमचे ऑलिन्ह ऑईल मिसळून काचेचे भांडे झाकनाने बंद करा. 15 दिवस या साली तेलात मुरल्यावर त्या तेलाने अवयवांना मालीश करा. काही काळ हे तेल शरीरावर तसेच ठेवा. थोड्या वेळाने पाण्याने अवयव स्वच्छ धुवून काढा.

लिंबूच्या सालीमध्ये व्हिटॅमीन सी आणि कॅल्शियम अधिक प्रमाणात असते. लिंबूची साल शरीरातील हाडे मजबूत होण्यासाठी लाभदायी असतात. आपल्याकडे लिंबूचे लोणचेही बनवले जाते. लिंबूच्या साली आर्थराइटिस आणि ऑस्टियोपोरोसिसवर गुणकारी असतात.

टिप: वरील उपाय करण्यापूर्वी एखदा डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपणास एखाद्या पदार्थाची एलर्जी असू शकते. ज्याच्या सेवनाने अथवा त्वचेशी संपर्क आल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे असा कोणताही उपाय करण्या आधी तज्ज्ञाचा सल्ला घेणे केव्हाही उत्तम.

Web Title: Amazing benefits of lemon peels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.