वेगाने कमी होणार लठ्ठपणा, शुगर लेव्हलही कंट्रोल; मका खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 05:06 PM2024-08-12T17:06:23+5:302024-08-12T17:13:29+5:30
मक्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स असतात. अशा परिस्थितीत याच्या सेवनाने आरोग्याला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात. मका आरोग्यासाठी किती आणि कसा फायदेशीर आहे? लठ्ठपणा कमी होतो का? याबाबत जाणून घेऊया...
निरोगी राहण्यासाठी शरीरात व्हिटॅमिन्स आणि पोषक तत्वं असणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी लोक अनेक गोष्टींचे सेवन करतात, परंतु यासाठी कॉर्न म्हणजे मका खाणं हे अधिक फायदेशीर ठरू शकतं. मक्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स असतात. अशा परिस्थितीत याच्या सेवनाने आरोग्याला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात. मकाआरोग्यासाठी किती आणि कसा फायदेशीर आहे? लठ्ठपणा कमी होतो का? याबाबत जाणून घेऊया...
डाइटिशियन शीतल गिरी यांनी न्यूज १८ हिंदीला याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मका हा पौष्टिक घटकांनी युक्त आहे. यामध्ये कार्ब्स, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन बी9, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासह अनेक पोषक घटक असतात. याशिवाय यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्सही आढळतात. हे आरोग्य चांगले ठेवतात आणि पचनासाठी खूप फायदेशीर ठरतात.
डोळे निरोगी ठेवतात
तज्ज्ञांच्या मते, डोळे निरोगी ठेवण्यासाठी मका खा. वास्तविक मक्यामध्ये ल्युटीन मुबलक प्रमाणात आढळतं, ज्यामुळे दृष्टी चांगली ठेवता येते.
पचनक्रिया सुधारते
मक्याचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते. मका फायबरसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. अशा स्थितीत याच्या सेवनाने ब्लोटिंग, गॅस आणि अपचन यापासून आराम मिळतो.
शुगर लेव्हल कंट्रोल
आहारतज्ज्ञांच्या मते, मका शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. त्याचा आहारात समावेश केल्यास मधुमेहावर नियंत्रण ठेवता येतं. यामध्ये असलेले घटक मधुमेह नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहेत.
लठ्ठपणा होतो कमी
मक्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते, जे पचनासाठी अत्यंत फायदेशीर असतं. अशा स्थितीत याच्या सेवनाने वजन कमी होते. तसेच हे खाल्ल्याने पोट जास्त काळ भरलेलं जाणवतं.