'या' ४ लोकांना दालचीनीच्या पाण्याने मिळतील अद्भूत फायदे, जाणून घ्या कसं कराल सेवन!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 12:25 PM2024-11-27T12:25:28+5:302024-11-27T12:34:09+5:30

Cinnamon Water Benefits : दालचीनीचं पाणी हा एक सरळ, सोपा आणि नॅचरल उपाय आहे. अशात खालीलपैकी कोणतीही समस्या तुम्हाला असेल तर या पाण्याचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. 

Amazing benefits of drinking cinnamon water on empty stomach, know how to consume it! | 'या' ४ लोकांना दालचीनीच्या पाण्याने मिळतील अद्भूत फायदे, जाणून घ्या कसं कराल सेवन!

'या' ४ लोकांना दालचीनीच्या पाण्याने मिळतील अद्भूत फायदे, जाणून घ्या कसं कराल सेवन!

Cinnamon Water Benefits :  दालचीनीला मसाल्यांचा राजा म्हटलं जातं. याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. दालचीनी पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. खासकरून काही लोकांना यापासून अधिक फायदे होतात. दालचीनीचं पाणी हा एक सरळ, सोपा आणि नॅचरल उपाय आहे. अशात खालीलपैकी कोणतीही समस्या तुम्हाला असेल तर या पाण्याचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. 

कुणासाठी फायदेशीर दालचीनीचं पाणी?

१) डायबिटीसचे रूग्ण

जर तुम्हाला डायबिटीस असेल तर दालचीनीचं पाणी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. यात नॅचरली ग्लूकोज कमी कंट्रोल करण्याची क्षमता असते. याने इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढून ब्लड शुगर कंट्रोल केली जाते. रोज सकाळी दालचीनीचं पाणी प्यायल्याने शुगर लेव्हलमध्ये सुधारणाही होते.

२) वजन कमी करणारे

जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासाठी दालचीनीचं पाणी एक रामबाण उपाय आहे. याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि फॅट बर्न होण्याची प्रोसेस वेगाने होते. सोबतच याने भूकही कंट्रोल  होते. अशात तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.

३) हृदयरोगी

दालचीनीमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. जे हार्ट हेल्थसाठी फायदेशीर असतात. याने शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासही मदत मिळते आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढतं. ज्या लोकांना हृदयरोग आहे किंवा ज्यांना यापासून बचाव करायचा आहे त्यांच्यासाठी हे पाणी फायदेशीर ठरू शकतं.

४) इम्यूनिटी कमजोर असेल तर...

जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असेल तर दालचीनीचं पाणी एक बेस्ट उपाय आहे. यात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-फंगल गुण असतात, जे शरीराचा इन्फेक्शनपासून बचाव करतात. तसेच हे पाणी रोज प्यायल्याने शरीर मजबूत होतं आणि आजारांसोबत लढण्याची क्षमताही वाढते.

कसं तयार कराल हे पाणी?

एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा दालचीनी पावडर टाका. हे पाणी रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी हे पाणी हलकं गरम करा आणि गाळून रिकाम्या पोटी सेवन करा. एक महत्वाची बाब म्हणजे दालचीनीच्या पाण्याचं जास्त प्रमाणात सेवन करू नये. कारण हे लिव्हरसाठी नुकसानकारक ठरू शकतं.

(टिप - वरील लेखातील सल्ले हे सामान्य माहितीवर आधारीत आहेत. काही लोकांसाठी हा उपाय फायदेशीर ठरतो तर काहींसाठी नुकसानकारक. त्यामुळे या वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.)
 

Web Title: Amazing benefits of drinking cinnamon water on empty stomach, know how to consume it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.