लिव्हरमध्ये जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढण्याचा बेस्ट उपाय, लगेच करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 11:19 AM2024-03-08T11:19:54+5:302024-03-08T11:32:09+5:30

Liver Detox : न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवाल यांनी लिव्हर कसं स्वच्छ करायचं याबाबत सांगितलं आहे. तसेच कुणी लिव्हरची स्वच्छता करावी हेही सांगितलं आहे.

Amazing benefits of eating Amla can clean liver in these 10 people | लिव्हरमध्ये जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढण्याचा बेस्ट उपाय, लगेच करा!

लिव्हरमध्ये जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढण्याचा बेस्ट उपाय, लगेच करा!

Liver Detox : लिव्हर शरीरातील महत्वाचा अवयव आहे. काळानुसार, लिव्हर आतून स्वच्छ करण्याची गरज पडत असते. पण ते कसं स्वच्छ करायचं हे जास्तीत जास्त लोकांना माहीत नसतं. लिव्हरमध्ये अनेक विषारी पदार्थ जमा होत असतात ते वेळोवेळी बाहेर काढायचे असतात. हे विषारी पदार्थ जास्त फॅट असलेले पदार्थ खाऊन, सुस्त लाइफस्टाईल, मद्यसेवन किंवा धूम्रपानामुळे लिव्हरमध्ये जमा होतात. यामुळे लिव्हरसंबंधी अनेक गंभीर समस्या होऊ लागतात.

लिव्हर स्वच्छ करण्यासाठी लाइफस्टाईल आणि आहारात काही महत्वाचे बदल करावे लागतात. अनेक आयुर्वेदिक आणि घरगुती उपायांचीही मदत घेतली जाते. न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवाल यांनी लिव्हर कसं स्वच्छ करायचं याबाबत सांगितलं आहे. तसेच कुणी लिव्हरची स्वच्छता करावी हेही सांगितलं आहे.

या लोकांनी करावं लिव्हर स्वच्छ

ज्यांचं वजन कमी होत नाही

कमी वयात केस पांढरे झालेले लोक

व्हिटॅमिन डी 3, व्हिटॅमिन बी 12, आयर्नची कमी

सतत थकवा वाढणे

भूक कमी होणे

चेहऱ्यावर सुरकुत्या

पायांवर सूज असलेले

मान काळी पडलेले

पिंपल्स आणि एलर्जी

वजन कमी करण्यासाठी महत्वाचं

जेव्हा लिव्हरमध्ये टॉक्सिन वाढतात तेव्हा ते आपलं काम योग्यपणे करू शकत नाही. यामुळे फॅट एनर्जीमध्ये बदलत नाही आणि जमा होऊन राहतं. याने तुमच्या पचनावरही प्रभाव पडतो. तसेच तुमची भूकही कमी होते. 

व्हिटॅमिन डी3 बनवतं लिव्हर

हाडे मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन डी 3 ची गरज असते. उन्ह मिळाल्यावर लिव्हर हे तयार करतं. यासोबतच आयर्न बॅलन्स करणार्या हॉर्मोन्सची निर्मितीही केली जाते. लिव्हर खराब होत असेल तर यांची कमतरता होते. ज्यामुळे थकवा, पायांवर सूज, केस पांढरे होणे अशा समस्या होऊ लागतात.

लिव्हर स्वच्छ करतो आवळा

तुम्हाला वरच्या कोणत्याही समस्या असतील तर टेंशन घेण्याची गरज नाही. तुम्ही लगेच आवळा खाणं सुरू करा. आवळ्याने लिव्हर डिटॉक्स होतं आणि स्वच्छ होतं. आवळे तुम्ही कच्चे खाऊ शकता किंवा त्यांचा ज्यूस पिऊ शकता. तसेच याच्या पावडरचाही वापर करू शकता.

Web Title: Amazing benefits of eating Amla can clean liver in these 10 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.