रोज सकाळी रिकाम्या पोटी खा कढीपत्त्याची काही पाने, फायदे वाचाल तर रोज खाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 10:23 AM2024-08-26T10:23:38+5:302024-08-26T10:24:18+5:30

Curry Leaves Benefits : एक्सपर्टनुसार रोज सकाळी रिकाम्या पोटी जर कढीपत्त्याची पाने खाल्लीत तर आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.

Amazing benefits of eating curry leaves on empty stomach daily | रोज सकाळी रिकाम्या पोटी खा कढीपत्त्याची काही पाने, फायदे वाचाल तर रोज खाल!

रोज सकाळी रिकाम्या पोटी खा कढीपत्त्याची काही पाने, फायदे वाचाल तर रोज खाल!

Curry Leaves Benefits : वेगवेगळे पदार्थ बनवत असताना कढीपत्त्याचा वापर जास्तीत जास्त घरांमध्ये केला जातो. कढीपत्त्याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच सोबतच याने आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. एक्सपर्टनुसार रोज सकाळी रिकाम्या पोटी जर कढीपत्त्याची पाने खाल्लीत तर आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. ज्यांबाबत लोकांना फार माहिती नसते. तेच फायदे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कढीपत्त्यांमधील पोषक तत्व

कढीपत्त्यांमध्ये फॉस्फोरस, कॅल्शियम, आयर्न, कॉपर, व्हिटॅमिन आणि मॅग्नेशियमसारखे न्यूट्रिएंट्स आढळतात. जे शरीराला वेगवेगळे फायदे देण्याचं काम करतात. चला जाणून घेऊ रोज सकाळी जर ही 3 ते 4 पाने खाल्ली तर तुम्हाला याचा काय फायदा होतो.

1) डोळ्यांसाठी फायदेशीर

कढीपत्त्याची पाने खाल्ल्याने नाईट ब्लाइंडनेस किंवा डोळ्यांशी संबंधित इतर आजारांचा धोकाही टाळला जाऊ शकतो. कारण यात डोळ्यांसाठी आवश्यक व्हिटॅमिन ए असतं. याने डोळ्यांची दृष्टी अधिक वाढते.

2) डायबिटीसमध्ये फायदेशीर

डायबिटीसमध्ये अनेकदा रूग्णांना ही पाने चावून खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण यात हायपोग्लायसेमिक तत्व आढळतात. जे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करतात.

3) पचन तंत्र सुधारतं 

ही पाने रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने डायजेशन चांगलं होतं. सोबतच बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी, ब्लोटिंगसहीत पोटासंबंधी अनेक समस्या दूर होतात.

4) इंफेक्शनपासून बचाव

कढीपत्त्यामध्ये अ‍ॅंटीफंगल आणि अ‍ॅंटी-बायोटीक गुण आढळतात. ज्याने अनेक प्रकारच्या इंफेक्शनपासून बचाव होतो. याने अनेक आजारांचा धोका टाळला जातो.

5) वजन होईल कमी

ही पाने खाल्ल्याने वजन आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत मिळते. कारण यात एथिल एसीटेट महानिम्बाइन आणि डाइक्लोरोमेथेन सारखे तत्व आढळतात.

6) कोलेस्ट्रॉल कंट्रोल होतं

कढीपत्त्याच्या नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. या पानांमधील अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट कोलेस्ट्रॉलचं ऑक्सीकरण रोखण्यास मदत करतात.

Web Title: Amazing benefits of eating curry leaves on empty stomach daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.