घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात टाका लिंबाचा रस, मग बघा कमाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 09:59 AM2024-05-31T09:59:31+5:302024-05-31T10:00:12+5:30
Lemon Skin Care Tips:लिंबाचा रस वेगवेगळ्या माध्यमातून सेवन करता. तेच जर लिंबाचा थोडा रस तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकला तर तुम्हाला अनेक फायदे मिळतील.
Lemon Skin Care Tips: उन्हाळा म्हटला की, घामामुळे आणि उष्णतेमुळे शरीराची चांगलीच लाहीलाही होते. घामामुळे चिकट होतं, तर उन्हामुळे त्वचेवर काळपटपणा येतो. त्वचेसंबंधी इतरही अनेक समस्या होतात. खाज, रॅशेज येतात. अशात या समस्या दूर करून शरीर डिटॉक्स करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहोत. शरीर आतून थंड करण्यासाठी तुम्ही नेहमीच लिंबू पाणी पिता. लिंबाचा रस वेगवेगळ्या माध्यमातून सेवन करता. तेच जर लिंबाचा थोडा रस तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकला तर तुम्हाला अनेक फायदे मिळतील. लिंबू आपल्या शरीरावरील सगळी घाण दूर करतो आणि त्वचेसंबंधी अनेक समस्याही याने दूर करता येतील. चला जाणून घेऊ याचे फायदे....
त्वचा चांगली होते
आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकणं हा फार जुना आयुर्वेदिक उपाय आहे. हा उपाय शरीर आणि त्वचेसाठी फार फायदेशीर मानला जातो. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी चं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे याने त्वचेसंबंधी समस्या होत नाहीत. अशात केमिकलयुक्त साबणाऐवजी लिंबाच्या रसाच्या रसाचा वापर करू शकता.
सुरकुत्या होतील दूर
वाढत्या वयासोबत आपल्या त्वचेचं रंग रुपही बदलतं. वाढत्या वयासोबत जेव्हा आपण आपल्या शरीराला चांगला पौष्टिक आहार मिळाला नाही किंवा त्वचेची योग्य ती काळजी घेतली गेली नाही तर त्वचेसंबंधी समस्या निर्माण होऊ लागतात. या ठीक करण्यासाठी तुम्ही रोज आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकू शकता. आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकल्याने त्वचा ताजी आणि टाइट राहते. सुरकुत्या कमी होतात.
शरीराची दुर्गंधी येत नाही
जर कुणाच्या शरीरातून दुर्गंधी येऊ लागते तेव्हा समजून घ्या की, भविष्यात तुम्ही एखाद्या गंभीर आजाराचे शिकार होणार आहात. पण अनेकदा घामामुळेही शरीराची दुर्गंधी येऊ लागते. अशात तुम्ही आंघोळीच्या पाण्यात लिंबाच्या रसाचा वापर करावा.