कचरा समजून फेकू नका कांद्याची साल, फायदे वाचाल तर व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 12:20 PM2023-09-21T12:20:05+5:302023-09-21T12:20:36+5:30
Onion Peel Benefits : आज आम्ही तुम्हाला कांद्याच्या सालीचे आरोग्याला होणारे फायदे सांगणार आहोत जे वाचून तुम्ही अवाक् व्हाल.
कांदा आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा भाग आहे. कांद्याचे आरोग्याला किती फायदे होतात हेही सगळ्यांना माहीत असेल. कांदा कापला की, जास्तीत जास्त लोक त्याची साल फेकून देतात. पण अनेकांना हे माहीत नाही की, कांद्यासारखेच कांद्याच्या सालीचे देखील फायदे असतात. आज आम्ही तुम्हाला कांद्याच्या सालीचे आरोग्याला होणारे फायदे सांगणार आहोत जे वाचून तुम्ही अवाक् व्हाल.
कोलेस्ट्रॉल कमी करणे
कांद्याची साल रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यास आणि ते पाणी सकाळी प्यायल्यास अनेक फायदे होतात. याची पाण्याची टेस्ट जरी चांगली नसली तरी यात साखर टाकून प्यायल्यास फायदा दिसेल. रोज याचे सेवन केल्यास बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते.
अॅलर्जीपासून सुटका
जर तुम्हाला स्कीन अॅलर्जीची समस्या असेल तर कांद्याची साल तुम्हाला फायद्याची ठरु शकते. रात्रभर काद्यांची साल पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी स्कीनवर लावा. काही दिवस हे रोज केल्यास अॅलर्जीपासून आराम मिळेल.
केसांना फायदा
मुली केसांना मुलायम आणि चमकदार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कंडीशनर वापरतात. पण कांद्याच्या सालीनेही तुम्हाला हे करता येतं. कांद्याच्या सालीच्या पाण्याने केस धुतल्यास केस चमकदार आणि मुलायम होतील.
चेहऱ्यावरील डाग
चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी वेगवेगळ्या महागड्या उत्पादनांचा वापर केला जातो. कांद्याच्या रसयुक्त सालीमध्ये हळद मिश्रित करुन चेहऱ्यावर लावल्यास डाग दूर होतील. काही दिवस तुम्हाला हा उपाय करावा लागेल.
गाल मुलायम करण्यासाठी
गाल कोरडे झाल्यास कांद्याचा उपयोग केला जाऊ शकतो. कांद्याची साल गरम पाण्यात उकळून त्याचा वापर करा. याने गाल मुलायम होतील.