कडूलिंबाचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 11:11 AM2018-06-13T11:11:50+5:302018-06-13T11:11:50+5:30
आपल्या औषधी गुणांमुळे या झाडाचं महत्त्व खूप मोठं आहे. कडूलिंबाचे काही मोजकेच फायदे आपल्याला माहिती असतात... चला जाणून घेऊया कडूलिंबाचे फायदे...
मुंबई: कडूलिंब प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत असतो. कडूलिंब एक असं झाड आहे, जे खूप कडू असतं. पण आपल्या औषधी गुणांमुळे या झाडाचं महत्त्व खूप मोठं आहे. कडूलिंबाचे काही मोजकेच फायदे आपल्याला माहिती असतात... चला जाणून घेऊया कडूलिंबाचे फायदे...
१. त्वचा आणि केसांची काळजी घेत रक्त शुद्ध करण्याचं काम कडूलिंब करतं. यासाठी कडूलिंबाच्या सालाचा काढा बनवून प्यावा. याने सतत येणारा ताप किंवा तुमच्या अंगात मुरलेला तापही दूर होतो.
२. कडूलिंबाची पानं बारीक करून दही आणि मुल्तानी मातीमध्ये मिसळून पेस्ट बनवा. हा पॅक चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरी डाग काही दिवसांतच नाहीसे होतात.
3. खराब पाण्यामध्ये डास झाल्यानं आजारांचा गतीनं फैलाव होतो. यावरही कडूलिंब एक उपाय ठरतो. अशक्तपणाही दूर होतो. जर कुणा रुग्णाला लघवी होत नसेल तर कडूलिंबाची पानं बारीक करून पेस्ट पोटावर लावावी, बरं वाटेल.
4. दातांच्या आरोग्यासाठी कडूलिंब उपयुक्त आहे. शक्य असेल तर घरीच त्याचं मंजन बनवून घ्या. त्यात जळलेली सुपारी, जळलेल्या बदामचे साल, थोडी मिरेपूड, ५ ग्राम लवंग, एक अर्धा ग्राम पेपरमिंट बारीक करून मंजन तयार करावं.
5. जर आपल्याला पोटाच्या समस्या असतील, पोट साफ होत नसेल तर निंबोणी खावी, पोट साफ होईल. रक्त स्वच्छ होईल आणि भूकही चांगली लागेल.
6. कान दुखत असेल, कानातू पू येत असेल तर कडूलिंबाचं तेल मधात मिसळून साफ करा, पू येणं बंद होईल. तसेच सर्दी-खोकला झाला असेल तर कडूलिंबाची पानं मधात मिसळून चाटण घ्यावं, गळ्यातील खवखव बरी होते.
7. जर पोटात किरम (किडे) झाले असतील तर पानांच्या रसात मध मिसळून चाटण घ्यावं कीडे मरतील. कडूलिंबाच्या पानात थोडं हिंग मिसळून चाटण घ्यावं, पोटातील किडे नष्ट होतात.
8. कडूलिंबाचं तेल फॅटी अॅसिड आणि त्वचेत सहजपणे शोषून घेतलं जातं. त्यात व्हिटॅमिन ई असतं, ते त्वचेच्या पेशींमधील लवचिकता कायम ठेवतात.