टाळ्या वाजवण्याचे ९ आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 03:10 PM2018-09-06T15:10:31+5:302018-09-06T15:11:09+5:30

टाळ्यांचा संबंध चांगले काम आणि यश याच्याशी संबंधित आहे. परीक्षेत चांगले गुण मिळाले असेल, प्रमोशन झालं असेल, एखादा आनंद झाला असेल तर आपण टाळ्या वाजवतो.

Amazing health benefits of clapping | टाळ्या वाजवण्याचे ९ आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?

टाळ्या वाजवण्याचे ९ आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?

googlenewsNext

टाळ्यांचा संबंध चांगले काम आणि यश याच्याशी संबंधित आहे. परीक्षेत चांगले गुण मिळाले असेल, प्रमोशन झालं असेल, एखादा आनंद झाला असेल तर आपण टाळ्या वाजवतो. आपल्या शरीरात एकूण ३४० प्रेशर पॉईंट असतात. ज्यातील २९ आपल्या हातांमध्ये असतात. एका तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रेशर पॉईंटबाबत माहिती घेता येते आणि केवळ टाळ्या वाजवून प्रेशर थेरपीचा फायदा घेतला जाऊ शकतो. हे प्रेशर पॉईंट्स शरीराच्या वेगवेगळ्या भागांना थेट जोडले गेलेले असतात. त्यामुळे टाळ्या वाजवून वेदनांपासून सुटका मिळवू शकतो. 

क्लॅपिंग थेरपी

खोबऱ्याचं तेल, मोहरीतं तेल किंवा हे दोन्ही तेल मिश्रीत करुन हातांवर लावा. आता सॉक्स किंवा लेदर शूज घाला जेणेकरुन शरीरातून उत्पन्न होणारी ऊर्जा व्यर्थ जाणार नाही. आता दोन्ही हातांना सरळ आणि एकमेकांच्या समांतर ठेवा. हात थोडे सैल ठेवा. आता टाळी वाजवा. तज्ज्ञांनुसार, ही थेरपी सकाळी केल्यास अधिक फायदा होईल. सकाळी २० ते ३० मिनिटे टाळ्या वाजवल्यास तुमचं आरोग्य चांगलं राहिल. जसे की, टाळ्या वाजवल्याने रक्तप्रवाह चांगला होतो. तसेच याने रक्तवाहिन्यांमध्ये असलेल्या खराब कोलेस्ट्रॉलसारखी घाण स्वच्छ केली जाते. 

प्रेशर पॉईंट दाबल्याने होतात हे फायदे

१) टाळ्या वाजवल्याने हृदय आणि फुफ्फुसासंबंधी अस्थमासारख्या समस्या दूर करण्यास मदत मिळते.

२) पाठदुखी, मानदुखी आणि सांधेदुखीपासून सुटका मिळते.

३) टाळ्या वाजवल्याने सांधीवात रोगापासून बचाव केला जाऊ शकतो. 

४) लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी या थेरपीची मदत घ्यावी. 

५) पचनक्रियेसंबंधी समस्या दूर करण्यासाठी क्लॅपिंग थेरपीचा फायदा होतो.

६) क्लॅपिंग थेरपीमुळे लहान मुलांच्या कार्यक्षमतेचा विकास होतो आणि अभ्यासात सुधारणा होते. जी मुलं रोज टाळ्या वाजवतात त्यांना लिहिण्यात काही अडचण येत नाही.  

७) टाळ्या वाजवल्याने मुलांचा मेंदु आणखी चांगलं काम करतो. 

८) शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि वेगवेगळ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी ही थेरपी फायद्याची आहे. 

९) रोज अर्धा तास टाळ्या वाजवल्याने सांधीवात, उच्च रक्तदाब, डिप्रेशन, डोकेदुखी, सर्दी, झोप न येणे, केसगळती आणि डोळ्यांशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते. 

Web Title: Amazing health benefits of clapping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.