झटपट वजन कमी करायचंय?; पाणी किंवा ज्यूसमध्ये या पदार्थाचं करा सेवन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 02:03 PM2019-06-18T14:03:59+5:302019-06-18T14:21:54+5:30

सध्याची बदलणारी जीवनशैली आणि असंतुलित आहार यांमुळे वाढणारं वजन तसेच लठ्ठपणाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. वजन वाढायला वेळ लागत नाही, मात्र कमी करण्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागतात.

Amazing health benefits of isabgol how it helps in weight loss | झटपट वजन कमी करायचंय?; पाणी किंवा ज्यूसमध्ये या पदार्थाचं करा सेवन

झटपट वजन कमी करायचंय?; पाणी किंवा ज्यूसमध्ये या पदार्थाचं करा सेवन

googlenewsNext

सध्याची बदलणारी जीवनशैली आणि असंतुलित आहार यांमुळे वाढणारं वजन तसेच लठ्ठपणाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. वजन वाढायला वेळ लागत नाही, मात्र कमी करण्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागतात. पण तुम्हाला जर कोणी सांगितलं की, वजन कमी करण्यासाठी फार काही कष्ट न घेता फक्त दररोज एक काम करायचं आहे, तर? होय... खरयं... तुम्हाला अजिबात कष्ट न घेता, पाणी किंवा ज्यूसमध्ये एक अशी गोष्ट एकत्र करून त्याचं सेवन करायचं आहे. असं केल्याने तुम्ही फक्त एका महिन्यामध्ये चक्क तीन किलोपर्यंत वजन कमी करू शकता. तो पदार्थ म्हणजे, इसबगोल.

इसबगोल ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. इसबगोलमध्ये असणाऱ्या गुणधर्मांमुळे फक्त वेट लॉसचं होत नाही, तर बद्धकोष्टासारख्या समस्यांपासूनही सुटका होते. याशिवाय आरोग्याच्या अनेक समस्यांवर इसबगोल फायदेशीर ठरते. हे शरीराला डिटॉक्स करण्याचं काम करतं. तुम्हाला कदाचितच याच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत माहिती असेल. परंतु, याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया इसबगोलच्या फायद्यांबाबत...

वजन कमी करण्यासाठी गुणकारी... 

इसबगोल बारिक भुश्यासारखं दिसतं. जेव्हा हे पाणी किंवा ज्यूससोबत घेतलं जातं, त्यावेळी हे भिजून वाढतं. दोन चमचे इसबगोल भिजवल्यानंतर जवळपास एक ग्लासापेक्षाही जास्त होतं. याच कारणामुळे याचं सेवन केल्यामुळे पोट बऱ्याच वेळासाठी भरल्यासारखं वाटतं आणि यामध्ये कॅलरीदेखील कमी असतात. त्यामुळेच हे वजन कमी करण्यासाठी मदत करतं. वजन कमी करत असाल आणि सर्व उपाय करून थकला असाल तर दिवसातून दोन वेळा याचं सेवन करू शकता. रात्री खाण्याऐवजी आणि सकाळी नाश्ता केल्यानंतर इसबगोलचं सेवन करा. लक्षात ठेवा, जर तुम्हाला सतत पोटाच्या समस्यांचा सामान करावा लागत असेल तर याचं सेवन करणं टाळा. 

डिटॉक्सिफिकेशनसाठी बेस्ट

जर तुम्हाला किडनीच्या समस्या, अॅसिडिटी किंवा बद्धकोष्टाच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर इसबगोलचं सेवन करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं. हे शरीर डिटॉक्स करतं. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्यामुळे सतत तहान लागते. त्यामुळे शरीरातून विषारी घटक सहजपणे बाहेर टाकले जातात. इसबगोलमध्ये विघटनशील आणि अविघटनशील दोन्ही प्रकारचे फायबर्स असतात. त्यामुळे आतड्यांचंही कार्य सुरळीत पार पडतं. 

कॅलरी कमी असतात 

इसबगोलच्या दोन चमच्यांमध्ये 32 कॅलरी असतात. याच कारणामुळे याचं जेव्हा सेवन केलं जातं, त्यावेळी बरल्याप्रमाणे वाटतं पण कॅलरी फार कमी असतात. डेली फाइबर सप्लिमेंट म्हणून इसबगोल घेणं फायदेशीर ठरतं. यामुळे भूक कमी लागते. 

असं करा इसबगोलचं सेवन 

गरम पाण्यामध्ये किंवा ज्यूसमध्ये इसबगोल एकत्र करून पिऊ शकता. यामुळे हे चवीलाही उत्तम लागतं. खरं तर इसबगोलला स्वतःची अशी चव नसते. त्यामुळे हे ज्या पदार्थासोबत एकत्र करण्यात येईल त्याचीच चव यालाही मिळते. दोन चमचे इसबगोल तुम्हाला ज्यावेळी खूप भूक लागते, त्यावेळी घ्या. त्यामुळे भूक कंट्रोल करण्यासाठी मदत होते. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

Web Title: Amazing health benefits of isabgol how it helps in weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.