चिया सीड्स अनेक आजारांवर आहे रामबाण उपाय, जाणून घ्या याचे फायदे...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 11:46 AM2024-05-03T11:46:35+5:302024-05-03T11:47:35+5:30
Chia Seeds Benefits : चिया सीड्सच्या सेवनाने डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर आणि हार्टसंबंधी समस्या दूर करण्यास मदत मिळते. चला जाणून घेऊ याचे फायदे...
Chia Seeds Benefits : चिया सीड्सचं सेवन आजकाल भरपूर लोक करतात. कारण चिया सीड्स पौष्टिक आणि आरोग्यदायी असतात. चिया सीड्स बरचसे सब्जासारखे दिसतात. जे लोक वजन कमी करत आहेत जे चिया सीड्सचं जास्त सेवन करतात. यात प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. हे सीड्स वजन कमी करण्याशिवाय आणि आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात.
नॅशनल इंस्टीटयूट ऑफ हेल्थनुसार चिया सीड्स, सॅल्विया हिस्पानिका नावाच्या झाडापासून मिळतात. यात ओमेगा 3 फॅटी अॅसिडचं प्रमाणही भरपूर असतं. चिया सीड्सच्या सेवनाने डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर आणि हार्टसंबंधी समस्या दूर करण्यास मदत मिळते. चला जाणून घेऊ याचे फायदे आणि कसं कराल याचं सेवन...
हार्ट अटॅकचा धोका कमी
चिया सीड्सचा हृदयावर चांगला परिणाम होतो. यात हाय अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतं, जे हार्ट अटॅकच्या कारणांना कमी करण्यास मदत करतं. याच्या सेवनाने हृदयासंबंधी आजारांचा धोकाही कमी होतो.
कंबर होईल कमी
चिया सीड्समध्ये फायबर आणि प्रोटीन दोन्ही भरपूर असतं. या दोन्हींची वजन कमी करण्यात महत्वाची भूमिका असते. यात असे अनेक पोषक तत्व असतात जे मेटाबॉलिज्म बूस्ट करतात आणि वजन कंट्रोलमध्ये ठेवतात. यात असलेल्या फायबरमुळे भूकही कंट्रोल होते.
डायबिटीस होईल मॅनेज
चिया सीड्सचं नियमित सेवन केल्याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहते. चिया सीड्समध्ये मुख्यपणे फायबर आणि म्यूसिलेज असतात जे जेवणानंतर ब्लड ग्लूकोजची लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करतात. डायबिटीक रूग्णांसाठी या खूप फायदेशीर असतात.
डायजेस्टिव सिस्टम होतं मजबूत
आजारांपासून दूर राहण्यासाठी डायजेस्टिव सिस्टम मजबूत असणं फार महत्वाचं आहे. चिया सीड्समधील फायबर तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं आणि यातील फायबरमुळे बद्धकोष्ठतेची समस्याही कमी होते.
हाडे होतात मजबूत
चिया सीड्समध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन डीसारखे मिनरल्स आहेत. जे हाडे मजबूत करतात. बोन डेंसिटी आणि आरोग्य सुधारण्यासाठी कॅल्शिअम महत्वाचं असतं. चिया सीड्समधून या गोष्टी मिळतात.
कसं कराल सेवन?
चिया सीड्सचं पाणी
तुम्ही चिया सीड्सचं पाणी पिऊ शकता. त्यासाठी चिया सीड्स पाण्यात भिजवून ठेवा. रात्री झोपण्याआधी एक चमचा चिया सीड्स एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी चिया सीड्स चावून खावेत आणि पाणी प्यावे. चिया सीड्सच्या पाण्यामुळे शरीर डिटॉक्स होतं आणि अनेक गंभीर आजारांपासून बचाव होतो.
चिया सीड्स आणि लिंबू पाणी
लिंबू पाणी आणि चिया सीड्स दोन्हीचे वेगवेगळे फायदे आहेत. दोन्हींचं एकत्र सेवन केलं तर जास्त फायदे मिळतील. त्यासाठी एक ग्लास पाण्यात एका लिंबाचा रस पिळा त्यात एक चमचा चिया सीड्स आणि एक चमचा मध टाका. याच्या नियमित सेवनाने इम्यूनिटी बूस्ट होते आणि वेगवेगळ्या समस्यांपासून बचाव होतो.