रिकाम्या पोटी तुळशीचं पाणी पिऊन दूर होतील या ५ समस्या, जाणून घ्या इतर फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 10:02 AM2024-06-26T10:02:21+5:302024-06-26T10:04:34+5:30

Tulsi Water Benefits : तुळशीमध्ये अनेक औषधी गुण असतात. केवळ तुळशीची पानेच नाही तर याच्या बीया, फांद्या सगळ्यांचाच उपयोग औषधी म्हणून केला जातो.

Amazing health benefits of drinking tulsi water on empty stomach | रिकाम्या पोटी तुळशीचं पाणी पिऊन दूर होतील या ५ समस्या, जाणून घ्या इतर फायदे!

रिकाम्या पोटी तुळशीचं पाणी पिऊन दूर होतील या ५ समस्या, जाणून घ्या इतर फायदे!

Tulsi Water On Empty Stomach:  भारतात तुळशीच्या झाडाला फार महत्व आहे. तुळशी एक आयुर्वेदिक औषधी आहे आणि याला धार्मिक महत्वही आहे. तुळशीचा वेगवेगळ्या उपचारांमध्ये वापर केला जातो. अनेक एक्सपर्ट सांगतात की, तुळशीच्या पाण्याचं सेवन करून अनेक समस्या दूर करता येतात. याने केवळ इम्यूनिटी बूस्ट होते असं नाही तर मानसिक तणावही दूर केला जाऊ शकतो. अशात तुळशीच्या पाण्याचं सेवन केल्याने काय काय फायदे होतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार  आहोत.

तुळशीमध्ये अनेक औषधी गुण असतात. केवळ तुळशीची पानेच नाही तर याच्या बीया, फांद्या सगळ्यांचाच उपयोग औषधी म्हणून केला जातो. यात असे अनेक पोषक तत्व आहेत जे सर्दी-खोकल्यापासून अनेक समस्या दूर करतात. इतकंच नाही तर तुळशीच्या पाण्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि इन्फेक्शनचा धोकाही कमी होतो. तुळशीची काही पाने उकडून कोमट पाणी रिकाम्या पोटी प्यावे. याने तुमची पचन क्रियाही चांगली होते.

इम्यूनिटी वाढते

तुळशीचं झाड आपल्या इम्यूनोमॉड्यूलेटरी तत्वांसाठी जगभरात ओळखलं जातं. इम्यूनोमॉड्यूलेटरी तत्व म्हणजे या झाडामध्ये असे पोषक तत्व असतात जे इम्यून सिस्टीम मजबूत करतात. ज्यामुळे तुमचा इन्फेक्शनपासून आणि वातावरण बदलामुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव होतो.

डायजेशन सिस्टम चांगली राहते

पावसाळ्यात वातावरण बदलामुळे डायजेशन सिस्टीममध्ये बिघाड होत असतो. या दिवसांमध्ये पोटासंबंधी अनेक समस्या जसे की, गॅस, अॅसिडिटी, ब्लोटिंग, अपचन अशा समस्या होत असतात. या समस्या दूर करण्यासाठी तुळशीचं पाणी फार फायदेशीर ठरू शकतं. या पाण्याच्या सेवनाने शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ शरीरातून बाहेर पडतात.

अॅंटी-ऑक्सिडेंट्स

तुळशीमध्ये फ्लेवोनोइड्स, पॉलीफेनोल्स आणि एसेंशियल ऑयलसारखे तत्व असतात. हे तत्व आपल्या शरीरासाठी घातक फ्री रेडिकल्स नष्ट करण्यात मदत करतात. याने पेशीही डॅमेज होत नाहीत.

स्ट्रेस होतो कमी

तुळशीच्या पाण्याचं सेवन केल्याने आपला स्ट्रेस कमी करण्यास मदत मिळते. मनाला शांतता मिळते. तुळशीच्या पाण्यात तणाव आणि चिंता कमी करण्याची क्षमता असते.

सर्दी खोकला दूर होईल

जर तुम्ही पारंपारिक पद्धतीने तुळशीच्या पाण्याचं सेवन केलं तर तुम्ही सर्दी, खोकला आणि अस्थमा सारख्या समस्या दूर करू शकता. तुळशीचं पाणी प्यायल्याने श्वसनासंबंधी समस्या दूर होतात. तुळशी एक शक्तीशाली कपनाशक आहे. 

Web Title: Amazing health benefits of drinking tulsi water on empty stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.