हिवाळ्यात कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे, वाचाल तर लगेच प्यायला सुरूवात कराल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 05:16 PM2023-11-06T17:16:14+5:302023-11-06T17:25:00+5:30

Hot water drinking in Winter : हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे काही आणखी फायदे आहेत. ज्यांबाबत क्वचितच कुणाला माहीत असेल. चला जाणून घेऊ ते फायदे...

Amazing health benefits of drinking warm water during winters | हिवाळ्यात कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे, वाचाल तर लगेच प्यायला सुरूवात कराल!

हिवाळ्यात कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे, वाचाल तर लगेच प्यायला सुरूवात कराल!

Hot water drinking in Winter : अनेकांना हे माहीत नसतं की, हिवाळ्यात (Winter Health Tips) पाणी कमी प्यायल्याने बॉडी डिहायड्रेट होण्याची शक्यता जास्त असते. अशात तुम्ही कोमट पाणी (Hot water) पिऊनही शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवू शकता. हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे काही आणखी फायदे आहेत. ज्यांबाबत क्वचितच कुणाला माहीत असेल. चला जाणून घेऊ ते फायदे....

नाक आणि गळ्याची समस्या

हिवाळ्यात चहाच्या सेवनाने वाहतं नाक, खोकला, घशात खवखव किंवा तणाव अशा समस्या लगेच दूर होतात. गरम पाण्याने छातीतील कफ, खोकला आणि वाहत्या नाकापासून सुटका मिळते. गरम पाण्याने हिवाळ्यात खोकला, सर्दी आणि इन्फेक्शनची तीव्रता कमी होते. कारण यात बॅक्टेरियासोबत लढण्याची क्षमता असते.

अंगदुखीपासून सुटका

थंडीच्या दिवसात अनेक लोकांना मांसपेशींमध्ये तणाव आणि वेदना जाणवतात. तापमान कमी असल्याने जखमांमध्ये वेदना, सांधेदुखीची समस्या वाढू लागते. अशात गरम पाण्याने केवळ मांसपेशींमधील तणावच नाही तर डोकेदुखी, अंगदुखीही दूर होते. पाळीच्या दिवसात पोटात होणारी वेदनाही कमी होते.

वजन कमी

हिवाळ्यात मेटाबॉलिज्म रेट कमी झाल्याने आपलं वजन वाढू लागतं. अनेक रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, गरम पाणी आपल्या मेटाबॉलिज्म सिस्टमला बूस्ट करतं आणि शरीरात जमा होणारं फॅट कमी होतं. जे मुळात लठ्ठपणासाठी जबाबदार असतं. त्यामुळे लठ्ठपणा कंट्रोल करण्यासाठी तुम्ही गरम पाणी पिऊन दिवसाची सुरूवात करू शकता.

डायजेशन सुधारतं

एका रिसर्चनुसार, कोमट पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराचा मेटाबॉलिक रेट सुधारतो, ज्याने पचनक्रियेसंबंधी समस्या दूर होते. थंड पाण्याच्या तुलनेत कोमट पाणी शरीरात जास्त प्रभावी ठरतं. याने लूज मोशन, अपचन अशा समस्यांचा धोका कमी होतो. या समस्या कमी प्यायल्यानेही होतात. 

ब्लड सर्कुलेशनमध्ये सुधार

हिवाळ्यात आपलं ब्लड प्रेशर उन्हाळ्याच्या तुलनेत जास्त राहतं. कारण थंडीच्या दिवसात आपल्या रक्तावाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. गरम पाणी या रक्तवाहिन्यांना पसरवण्याचं, त्यांना सैल करण्याचं काम करतं. ज्याने अर्थातच ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. 

Web Title: Amazing health benefits of drinking warm water during winters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.