ब्रश करण्याआधी का दिला जातो पाणी पिण्याचा सल्ला? याने खरंच होतो का फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 10:23 AM2024-01-06T10:23:59+5:302024-01-06T10:24:54+5:30

Water Drinking before Brush : असाही एक दावा केला जातो की, सकाळी ब्रश न करता पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. चला जाणून घेऊ का दिला जातो असा सल्ला...

Amazing Health Benefits of Drinking Water in the Morning Before Brushing | ब्रश करण्याआधी का दिला जातो पाणी पिण्याचा सल्ला? याने खरंच होतो का फायदा?

ब्रश करण्याआधी का दिला जातो पाणी पिण्याचा सल्ला? याने खरंच होतो का फायदा?

Water Drinking before Brush : सामान्यपणे सगळ्यांनाच सवय असते की, झोपेतून उठल्यावर ते आधी ब्रश करतात, फ्रेश होतात आणि मग पाणी पितात. ब्रश केल्याने तोंडाची दुर्गंधीही दूर होते. सोबतच रात्रभर जमा झालेले किटाणूही दूर होतात. पण सोबतच दुसरीकडे असाही एक दावा केला जातो की, सकाळी ब्रश न करता पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. चला जाणून घेऊ का दिला जातो असा सल्ला...

प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांच्यानुसार, 'एका निरोगी व्यक्तीने एका दिवसात किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला हवं. याने शरीर हायड्रेट राहतं आणि उन्हाळ्यात असं करणं जास्त गरजेचं असतं. हेच कारण आहे की, जेव्हा सकाळी झोपेतून उठल्यावर तहान लागते तेव्हा आपण याचा विचार करत नाही की, ब्रश केला आहे की नाही.

ब्रश न करता पाणी पिण्याचे फायदे

सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्हाला जर जोरात तहान लागली असेल आणि विना ब्रश करता तुम्ही पाणी प्यायलात तर याने नुकसान होणार नाही. उलट याचे फायदेच होतात.

इम्यूनिटी बूस्ट होते

सकाळी ब्रश करण्याआधी तुम्ही एक ग्लास पाणी प्यायलात तर याने इम्यूनिटी बूस्ट होईल आणि कोणत्याही प्रकारच्या संक्रमणापासून तुमचा बचाव होईल.

डायजेस्टिव सिस्टीमला फायदा

ब्रश करण्याआधी पाणी प्यायल्याने डायजेस्टिव सिस्टीम चांगलं होतं. सोबतच याने तोंडाची दुर्गंधीही दूर होते.

केस स्ट्रॉंग आणि चमकदार

हे तर अनेकांना माहीत नसेल की, ब्रश न करता पाणी प्यायल्याने तुमचे केस स्ट्रॉंग आणि शायनी होतात. अशाप्रकारे पाणी प्यायल्याने चेहरा आणि त्वचेवर फ्रेशनेस येतो.

डायबिटीसमध्ये फायदेशीर

जर तुम्ही डायबिटीसचे रूग्ण असाल तर सकाळी झोपेतून उठताच पाणी प्यावे आणि यासाठी ब्रश करण्याची वाट बघू नये.

लठ्ठपणा कमी होतो

अनेक हेल्थ एक्सपर्ट मानतात की, अशाप्रकारे पाणी प्यायल्याने लठ्ठपणा हळूहळू कमी होऊ लागतो.

पोटाच्या समस्या होतात दूर

ब्रश न करता पाणी प्यायल्याने बद्धकोष्टता, अॅसिडिटीसारख्या पोटाच्या समस्याही होत नाहीत.

Web Title: Amazing Health Benefits of Drinking Water in the Morning Before Brushing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.