आयुर्वेदात शेवग्याला मानलं जातं सुपरफूड, फक्त शेंगाच नाही तर पानांपासूनही मिळतात फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 09:49 AM2024-06-07T09:49:37+5:302024-06-07T09:50:04+5:30

Moringa leaves : काही भागांमध्ये शेवग्याच्या पानांची आणि फुलांची भाजी सुद्धा खाल्ली जाते. शेवग्याच्या शेंगा, पानं आणि फुलांचा वापर आयुर्वेदिक औषधी म्हणूनही केला जातो. 

Amazing health benefits of drum stick or moringa leaves | आयुर्वेदात शेवग्याला मानलं जातं सुपरफूड, फक्त शेंगाच नाही तर पानांपासूनही मिळतात फायदे!

आयुर्वेदात शेवग्याला मानलं जातं सुपरफूड, फक्त शेंगाच नाही तर पानांपासूनही मिळतात फायदे!

Moringa leaves :  शेवग्याच्या शेंगा आणि पानं सुपरफूड मानले जातात. कारण याचे आरोग्याला इतके फायदे होतात ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. सामान्यपणे शेवग्याच्या शेंगांची भाजी लोक आवडीने खातात. तर काही भागांमध्ये शेवग्याच्या पानांची आणि फुलांची भाजी सुद्धा खाल्ली जाते. शेवग्याच्या शेंगा, पानं आणि फुलांचा वापर आयुर्वेदिक औषधी म्हणूनही केला जातो. 

शेवग्याच्या पानांमध्ये अमिनो अ‍ॅसिड, कार्बोहायड्रेट्, फायबर, व्हिटॅमिन, खनिज आणि फीटोन्यूट्रिएंट्स आढळतात. ज्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. शेवग्याच्या पानांचे शरीराला काय काय फायदे मिळतात याबाबत न्यूट्रिशनिस्ट दिग्विजय सिंह यांनी माहिती दिली आहे. 

शेवग्याचे फायदे

न्यूट्रिशनिस्ट दिग्विजय यांनी सांगितलं की, शेवगा नॅचरल मल्टीव्हिटॅमिन असतो. यात आढळणारे पोषक तत्व खूप जास्त फायदेशीर असतात. शेवग्यामध्ये दुधापेक्षा तिप्पट कॅल्शिअम असतं. तसेच शेवग्यामध्ये केळींपेक्षा चार पटीने जास्त पोटॅशिअम असतं. जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं.

शेवग्यामध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर असतं. ज्यामुळे त्वचा आणि आरोग्य चांगलं राहतं. शेवग्याच्या नियमित सेवनाने भरपूर आयर्न मिळतं. जर तुम्हाला नेहमीच थकवा जाणवत असेल तर शेवग्याच्या शेंगा किंवा पानांची भाजी खावी. शेवग्याच्या पानांचा रस दिवसातून एक किंवा दोन वेळा सेवन करू शकता. यापेक्षा जास्त सेवन कराल तर नुकसानही होऊ शकतं.

शेवग्याचे फायदे

- शेवग्याच्या पानांचं सेवन केल्याने त्वचा आणि केसही चांगले होतात. याने शरीरात होणारा ऑक्सीडेटिव स्ट्रेस कमी केला जाऊ शकतो. 

-  शेवग्याच्या सेवनाने लिव्हरही निरोगी राहतं. लिव्हर डिटॉक्ससाठी शेवगा खूप फायदेशीर मानला जातो. तसेच याने शरीरातील बॅड कॉलेस्ट्रोल दूर करण्यासही मदत मिळते.

- शेवग्याच्या सेवनाने पचनक्रिया चांगली होते. शेवग्यातील लॅक्सेटिव तत्व बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत मिळते.

- शेवग्यामध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-बायोटिक तत्व आढळतात. तसेच यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटही असतात.

Web Title: Amazing health benefits of drum stick or moringa leaves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.