शेवग्याच्या शेंगांची भाजीच नाही तर सूप पिऊनही मिळतात खूपसारे फायदे, जाणून घ्या कोणते!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 01:53 PM2024-07-02T13:53:43+5:302024-07-02T13:54:28+5:30
Drumstick Soup benefits : शेवग्याच्या शेंगांचं सूप कधी प्यायलात का? जर तुम्ही कधी प्यायले नसाल आणि त्याचे फायदे माहीत नसेल तर आज आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहोत.
Drumstick Soup benefits : शेवग्याच्या शेंगाना, पानांना, फुलांना आयुर्वेदात खूप महत्व आहे. कारण यांची भाजी खाऊन शरीराला अनेक फायदे मिळतात. शेवग्याच्या शेंगा किंवा पानांची भाजी खाऊ तुम्हाला खूप प्रोटीन मिळतं. तसेच इतरही अनेक पोषक तत्व शरीराला मिळतात. शेवग्याच्या शेंगाची, पानांची किंवा फुलांची भाजी तुम्ही अनेकदा खाल्ली असेल, पण शेवग्याच्या शेंगांचं सूप कधी प्यायलात का? जर तुम्ही कधी प्यायले नसाल आणि त्याचे फायदे माहीत नसेल तर आज आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहोत. शेवग्याच्या शेंगाचं सूप पिऊन तुम्ही खूप फायदे मिळवू शकता. हेच फायदे आज जाणून घेऊ.
शेवग्याच्या शेंगांचं सूप पिण्याचे फायदे
- शेवग्याच्या शेंगा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि आतड्या साफ करण्यासाठी ओळखल्या जातात. याने लिव्हर, किडन्या आतून स्वच्छ होतील. त्यासाठी शेवग्याच्या शेंगांच सूप तुम्ही नेहमी प्यायला हवं.
- शेवग्याच्या शेंगांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं. ज्यामुळे शरीराचा इन्फेक्शनपासून आणि वेगवेगळ्या आजारांपासून बचाव होतो. तसेच याच्या सेवनाने शरीरात पांढऱ्या रक्तपेशीही वाढतात. ज्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशा समस्याही होत नाहीत.
- नियमित शेवग्याच्या शेंगाचं सूप प्यायल्याने शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. शरीरात पोषक तत्व कमी झाल्यावर या सूपने ती कमी भरून निघते. यातील बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी मुळे इम्यूनिटी बूस्ट होते. ज्यामुळे तुम्ही नेहमी आजारी पडणार नाही.
- यात अॅंटी-इन्फ्लेमटरी गुण असतात ज्यामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत मिळते. तसेच याने सांधेदुखी आणि ऑस्टियोपोरोसिस सारख्या समस्याही दूर करण्यास मदत मिळते. यातील कॅल्शिअममुळे हाडे मजबूत होतात.
- शेवग्याच्या शेंगांमुळे पचनक्रिया चांगली होते. ज्यामुळे वजन कमी करण्यात मदत मिळते. रिकाम्या पोटी शेवग्याच्या शेंगांचं सूप प्यायल्याने पोटाचं आरोग्य चांगलं राहतं.
- शेवग्याच्या शेंगांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल लेव्हलही कमी होते. ज्यामुळे तुम्हाला हृदय रोगांचा धोका कमी होतो.
कसं बनवाल शेवग्याच्या शेंगांचं सूप?
डायटिशिअन श्वेता पांचाल यांनी शेवग्याच्या शेंगांचं सूप कसं बनवायचं याचा एक व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला आहे.