हिवाळ्यात हिरवे वाटाणे खाण्याचे एकापेक्षा एक फायदे, वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 09:31 AM2023-11-06T09:31:58+5:302023-11-06T09:32:35+5:30
जर आपण हिवाळ्यात नियमितपणे ताजे हिरवे वाटाणे खाल्ले तर आरोग्याला कोणकोणते फायदे होतात. चला जाणून घेऊ फायदे...
Benefits of Eating Green Peas In Winter: हिरवे वाटाणे हिवाळ्यात बाजारात मिळतात. तसे फ्रोजेन आणि ड्राय स्वरूपात ते वर्षभर मिळतात. पण फ्रोजन मटर खाणं आरोग्यासाठी चांगले मानले जात नाहीत. त्यामुळे हिरवे ताजे वाटाणे खाण्याचाच सल्ला दिला जातो. डायटीशिअन आयुषी यादव (Ayushi Yadav) यांनी सांगितलं की, जर आपण हिवाळ्यात नियमितपणे ताजे हिरवे वाटाणे खाल्ले तर आरोग्याला कोणकोणते फायदे होतात. चला जाणून घेऊ फायदे...
1) भरपूर प्रोटीन
हिरव्या वाटाण्यांमध्ये प्लांट बेस्ट प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं. जर यांचं नियमित सेवन केलं तर हाडे आणि मांसपेशी मजबूत होतील. सोबतच मसल्स रिपेअर करण्यासही मदत मिळेल. सोबतच मुलांच्या शरीराच्या विकासातही याने मदत मिळते.
2) फायबर भरपूर असतात
हिरव्या वाटाण्यामध्ये फायबर भरपूर असतं. हे खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेलं राहतं. ज्यामुळे तुम्ही जास्त जेवण करण्यापासून वाचता आणि हळूहळू वजन कमी होऊ लागतं. ज्यांना वजन कमी करण्याची इच्छा असते त्यांच्यासाठी हे फार फायदेशीर ठरू शकतात.
3) डायबिटीसमध्ये फायदेशीर
हिरव्या वाटाण्यांमध्ये ग्लायसिमिक इंडेक्स फार कमी असतो आणि याने ब्लड शुगर लेव्हल रेग्युलेट करण्यास मदत मिळते. त्यासोबतच याने अचानक शुगर वाढणंही रोखलं जातं तसेच फायबरमुळे कार्बोहायड्रेटचं एब्जॉर्ब्शनही कमी होतं. हेच कारण आहे की, हिरवे वाटाणे डायबिटीसच्या रूग्णांसाठी बेस्ट डाएट मानले जातात.
4) हृदयासाठी फायदेशीर
हिरव्या वाटाण्यांमध्ये असे अनेक मिनरल्स आढळतात जे हृदयाचं आरोग्य चांगलं करण्यास मदत करतात. म्हणजे मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि कॅल्शिअम हे सगळे पोषक तत्व ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. सोबतच याने नसांमधील बॅड कोलेस्ट्रॉलही कमी होतं.