आयुर्वेदात साखरेपेक्षा खडीसाखरेला आहे जास्त महत्व, फायदे वाचाल तर व्हाल अवाक्!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 10:44 AM2024-06-14T10:44:44+5:302024-06-14T10:45:16+5:30
Stone Sugar Benefits : आयुर्वेदातही खडीसाखरेला फार महत्व आहे. कारण याचे आरोग्याला अनेक फायदे होतात.
Stone Sugar Benefits : खडीसाखर भारतात घराघरांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरली जाते. खडीसाखरेचा वापर अनेकदा एक औषधी म्हणूनही केला जातो. कारण यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स भरपूर असतात. अनेक समस्या खडीसाखरेच्या मदतीने दूर होतात. आयुर्वेदातही खडीसाखरेला फार महत्व आहे. कारण याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण ते अनेकांना माहीत नसतात. आज तेच फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
वात, पित्त, कफ कमी करण्यासाठी खडीसाखरेचा वापर करण्याचा सल्ला आयुर्वेदात देण्यात आला आहे. त्यामुळे एक्सपर्टही साखरेपेक्षा खडीसाखर अधिक चांगली असल्याचं सांगितलं जातं.
खोकला-घशातील खवखव दूर होते
घशात खवखव होत असेल किंवा खोकला झाला असेल तर खडीसाखर खाल्याने लगेच आराम मिळतो. खडीसाखरेचा एक छोटा तुकडा तोंडात ठेवा. लहान मुलांनाही सर्दी-खोकला झाला असेल तर खडीसारखेचा एक तुकडा खायला द्या. खडीसाखर पाण्यात विरघळवून ते पाणीही तुम्ही पिऊ शकता.
उष्णता कमी होते
खडीसाखरेत गोडवा असण्यासोबतच थंडावाही असतो. उन्हात खडीसाखरेचा वापर थंड पेय तयार करण्यासाठीही केला जातो. एक ग्लास पाण्यात खडीसाखर मिश्रित करुन प्यायल्यास शरीराला आराम मिळण्यासोबतच एनर्जीही मिळते.
हिमोग्लोबिनचा वाढतं
गरम दुधामध्ये केसर आणि खडीसाखर मिश्रित करुन प्यायल्यास शरीरात शक्ती आणि एनर्जी येते. सोबतच शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. याने त्वचेलाही फायदा होतो.
हात आणि पायांची जळजळ दूर होते
लोणी आणि खडीसाखर समान प्रमाणात मिश्रित करुन लावल्यास हात आणि पायांची जळजळ दूर होते. दोन्ही पदार्थ हे थंडावा देणारे मानले जातात.
तोंडातील फोडं दूर करण्यासाठी
तोंडात फोड आले असतील तर खडीसाखरेत वेलची मिश्रित करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट फोडांवर लावल्याने लगेच आराम मिळेल.