पिकलेली पपई तर तुम्ही अनेकदा खाल्ली असेल आता कच्च्या पपईचे फायदे जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 09:39 AM2024-07-02T09:39:44+5:302024-07-02T09:40:25+5:30
Raw papaya benefits : जास्तीत जास्त लोक पिकलेली पपई खातात. पण आज आम्ही तुम्हाला कच्ची पपई खाण्याचे फायदे सांगणार आहोत.
Raw papaya benefits : पपई खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. पपई आरोग्यासाठी फायदेशीर गुणांचा खजिना मानली जाते. यात अनेक पोषक तत्व आढळतात. पपईच्या सेवनाने पोटासंबंधी समस्या जसे की, ब्लोटिंग, बद्धकोष्ठता, सूज इत्यादी समस्या दूर होतात. पचनक्रिया चांगली होण्यासाठी पपई खाल्ली जाते. जास्तीत जास्त लोक पिकलेली पपई खातात. पण आज आम्ही तुम्हाला कच्ची पपई खाण्याचे फायदे सांगणार आहोत.
- पपईमध्ये पपेन नावाचं तत्व असतं जे पचनक्रिया सुधारतं आणि पोटासंबंधी समस्या जसे की, गॅस, ब्लोटिंग, सूज आणि बद्धकोष्ठताही दूर करतं.
- कच्च्या पपईमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर असतं. जे कोलेजन उत्पादन वाढवतं. यामुळे त्वचा चांगली राहते. त्वचेवर सुरकुत्या आणि फाइन लाईन्स येत नाहीत.
- कच्च्या पपईमध्ये सूज कमी करणारे तत्व असतात. जे शरीरातील सूज कमी करतात.
- कच्च्या पपईमध्ये फायबर भरपूर असतं आणि कॅलरी कमी असतात. फायबरमुळे पोट जास्त वेळ भरून राहतं. ज्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही. अशात तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते.
- कच्च्या पपईमध्ये व्हिटॅमिन के भरपूर असतं. जे हाडं मजबूत करण्याचं काम करतं. हाडं मोडण्याचा किंवा कमजोर होण्याचा धोका टाळता येतो.
- कच्च्या पपईचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत मिळते. हेच कारण आहे की, कच्ची पपई डायबिटीसच्या रूग्णांसाठी फायदेशीर मानली जाते.
- कच्च्या पपईमध्ये मॅग्नेशिअम भरपूर असतं. जे मांसपेशींना आराम देतं आणि नर्वस सिस्टम डॅमेज होण्याचा धोकाही कमी राहतो. याने स्ट्रेस लेव्हल कमी करण्यास मदत मिळते.