शरीरासाठी संजीवनी आहे द्राक्षाचं हे खास ज्यूस, गंभीर आजारांपासून होईल बचाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 12:34 PM2024-04-23T12:34:08+5:302024-04-23T12:34:34+5:30
द्राक्षाच्या ज्यूसचे फायदेही भरपूर आहेत. याच्या ज्यूसमुळे हार्ट हेल्थ चांगली राहते आणि इतर अनेक समस्याही दूर होतात.
द्राक्ष खायला सगळ्यांनाच आवडतात आणि याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. यातून शरीराला व्हिटॅमिन सी, इतरही अनेक व्हिटॅमिन्स, मॅगनीज आणि अॅंटी-ऑक्सिडेंटसहीत अनेक महत्वाचे पोषक तत्व मिळतात. पण या नॅचरलपणे आढळणारी शुगरही जास्त असते. ज्यामुळे शुगर लेव्हल वाढू शकते. त्यामुळे हाय डायबिटीस असलेल्यांनी याच्या ज्यूसऐवजी तसेच खावेत. पण ज्यूसचे फायदेही भरपूर आहेत. याच्या ज्यूसमुळे हार्ट हेल्थ चांगली राहते आणि इतर अनेक समस्याही दूर होतात.
इम्यून सिस्टीम बूस्ट होते
द्राक्षांमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी आणि अॅंटी-ऑक्सिडेंटमुळे इम्यून सिस्टीम मजबूत करण्यास मदत मिळते. ज्यामुळे तुम्हाला अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत मिळते आणि अनेक आजारांचा धोकाही कमी होतो.
हाडे होतात मजबूत
द्राक्षाच्या ज्यूसमध्ये प्रोएंथोस्यानिडींस नावाचं तत्व असतं. यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. द्राक्षाच्या सेवनामुळे हाडांसंबंधी समस्या ऑस्टियोअर्थरायटिसमध्येही आराम मिळतो.
हृदयासाठी फायदेशीर
द्राक्षात असलेले अॅंटी-ऑक्सिडेंट आणि पॉलीफेनोल्स आपल्या हृदयाचं आरोग्य सांभाळण्यास मदत करतात. ज्यामुळे हृदयासंबंधी अनेक समस्यांचा धोका कमी होतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार यातील हायपोलिपिडेमिक गुण कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करतात.
ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं
वाढलेल्या ब्लड प्रेशरमुळे हृदयासंबंधी अनेक समस्या होतात. अशात चांगल्या आहाराची गरज असते. त्यामुळे द्राक्षाच्या ज्यूसचं सेवन केलं जाऊ शकतं. नियमितपणे संतुलित प्रमाणात या ज्यूसचं सेवन केलं तर अनेक फायदे मिळतील.
कॅन्सरचा धोका कमी होतो
यात असलेल्या अॅंटी-ऑक्सिडेंटमुळे कॅन्सरचा धोका कमी केला जाऊ शकतो. यात असलेल्या पोलीफेनोल्स, फ्लावोनॉयड्स आणि रेस्वरेट्रोलसारख्या अॅंटी-ऑक्सिडेंटने कॅन्सरच्या कोशिका वाढणं रोखलं जाऊ शकतं.