दोन्ही हात नियमितपणे एकमेकांवर घासण्याचे एकापेक्षा एक जबरदस्त फायदे, वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 12:20 PM2024-10-07T12:20:53+5:302024-10-07T12:45:39+5:30
Rubbing Palms Benefits : तुम्हीही कधीना कधी लोकांना पाहून किंवा घरातील मोठ्यांना पाहून असं केलं असेल. पण याने काय फायदे होतात हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Rubbing Palms Benefits : सामान्यपणे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, हिवाळ्यात जास्तीत जास्त लोक दोन्ही हात एकमेकांवर घासतात आणि त्यामुळे हात गरम होतात. शरीरातही उष्णता जाणवते. याने थंडी कमी लागते. तसेच तुम्ही हेही पाहिलं असेल की, कुणी चक्कर येऊन पडलं किंवा आजारी पडलं तर त्यांचे हात किंवा तळपाय रब केले जातात म्हणजे घासले जातात. तुम्हीही कधीना कधी लोकांना पाहून किंवा घरातील मोठ्यांना पाहून असं केलं असेल. पण याने काय फायदे होतात हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तळहात एकमेकांवर घासण्याचे फायदे
१) ब्लड सर्कुलेशन वाढतं
जेव्हा आपण दोन्ही तळहात एकमेकांवर घासतो तेव्हा शरीरातील ब्लड सर्कुलेशन वाढतं, ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तसेच आपल्याचा चांगलंही वाटतं. अशात आपली दैनंदिन कामे करण्यात काहीच अडचण येत नाही.
२) डोळ्यांना फायदा
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, तळहात एकमेकांवर घासल्याने आपल्या डोळ्यांना खूप फायदा मिळतो. हातांच्या उष्णतेमुळे डोळ्यांवर पडणारा तणाव कमी होतो. असं केल्याने डोळ्यांच्या आजूबाजूचा रक्तप्रवाह वाढतो. यासाठी सुरूवातीला तुम्ही हात हळूहळू रब करा आणि हळूहळू स्पीड वाढवा. जेव्हा हात हलके गरम होतील तेव्हा ते डोळ्यांवर लावा. याने डोळ्यांची दृष्टीही वाढेल आणि चमकही वाढेल.
३) टेंशन होईल कमी
हात एकमेकांवर घासणं आपल्या मानसिक आरोग्यासाठी देखील चांगलं असतं. कारण याने मेंदू शांत होऊ याला आराम मिळतो. हा व्यायाम केल्याने मेंदुच्या क्रिया व्यवस्थित होतात. तुम्हाला सकारात्मक वाटतं. सकाळी ही क्रिया केल्याने तुम्हाला अधिक फ्रेश वाटू शकतं.
४) हिवाळ्यात फायदेशीर
हिवाळ्यात अनेकदा लोकांचे हात थंडे होतात, ज्यामुळे आराम मिळवण्यासाठी लोक हात एकमेकांवर घासतात. असं केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. हिवाळ्यात थंड वाऱ्यामुळे बोटे आखडतात, अशात हात एकमेकांवर घासल्याने मसल्स अॅक्टिव होतात आणि आखडलेपणा कमी होतो.