लिंबाच्या रसासारखीच फायदेशीर असते याची साल, फायदे वाचून व्हाल अवाक्!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 01:32 PM2024-02-21T13:32:02+5:302024-02-21T13:32:41+5:30
Lemon Peel Benefits : जास्तीत जास्त लोक लिंबाचा वापर केल्यावर त्याची फेकून देतात. पण त्याचे फायदे अनेकांना माहीत नसतात. तेच आज जाणून घ्या...
Lemon Peel Benefits : लिंबाच्या सेवनाचे आपल्या आरोग्याला काय काय फायदे होतात हे सगळ्यांनाच माहीत माहीत आहे. लिंबाच्या रसात व्हिटॅमिन सी असतं. ज्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. त्यामुळेच अनेकजण लिंबूचा रोजच्या आहारात वापर करतात. पण अनेक लोकांना हे माहीत नसतं की, केवळ लिंबाचा रसच नाही तर याच्या सालीचेही आरोग्याला अनेक फायदे होतात. तेच आज आम्ही सांगणार आहोत.
लिंबाच्या सालीचे फायदे
लिंबूच्या सालीमध्ये कॅल्शीयम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि फायबर यांचे उच्च गुणधर्म असतात. म्हणूच आज आम्ही तुम्हाला लिंबूच्या सालिबद्धलचे औषधी गुणधर्म सांगणार आहोत. जे तुमच्या सांधेदुखीवर फायदेशीर ठरू शकेल.
लिंबाच्या सालीचा लेप
औषधी वापर करण्यासाठी लिंबूची साल काढताना लक्षात ठेवा की, लिंबूची केवळ पिवळी सालच काढा. आतला गर नको. या सालीचा लेप तयार करून शरीरावर ज्या ठिकाणी वेदना होतात अशा ठिकाणी लावा. हा लेप लावल्यावर त्या ठिकाणी एका कापडाने हलकेसे बांधून ठेवा. जेणेकरून, लेप हालणार नाही आणि खाली पडणार नाही. दोन तासानंतर हा लेप काढून टाका.
कसा तयार कराल हा लेप?
एका काचेच्या भांड्या लिंबाच्या काढलेल्या साली घ्या. यात 3 ते 4 चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळून काचेचे भांडे झाकनाने बंद करा. 15 दिवस या साली तेलात मुरल्यावर त्या तेलाने अवयवांना मालीश करा. काही काळ हे तेल शरीरावर तसेच ठेवा. थोड्या वेळाने पाण्याने अवयव स्वच्छ धुवून काढा.
लिंबाच्या सालीमध्ये व्हिटॅमीन सी आणि कॅल्शियम अधिक प्रमाणात असते. लिंबूची साल शरीरातील हाडे मजबूत होण्यासाठी लाभदायी असतात. आपल्याकडे लिंबूचे लोणचेही बनवले जाते. लिंबूच्या साली आर्थराइटिस आणि ऑस्टियोपोरोसिसवर गुणकारी असतात.