डॉक्टरांकडे जाण्याची येणार नाही वेळ जर या डाळीचा आहारात कराल समावेश, जाणून घ्या फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 01:56 PM2024-05-03T13:56:07+5:302024-05-03T13:56:44+5:30
Matki Dal Benefits: मोड आलेल्या मटकीचे फायदे तुम्हाला भरपूर माहीत असतील. आता मटकीच्या डाळीचे आणि या डाळीच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या.
Matki Dal Benefits: डाळी आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे तुम्हाला माहीत आहे. मूग डाळ, मसूर डाळ, चणा डाळ या सगळ्या डाळींमध्ये प्रोटीन भरपूर असतं. पण अशीही डाळ आहे जी इतर डाळींपेक्षा अधिक फायदेशीर आहे. पण आहारात या डाळीचा लोक कमी वापर करतात. ही डाळ म्हणजे मटकीची डाळ. मोड आलेल्या मटकीचे फायदे तुम्हाला भरपूर माहीत असतील. आता मटकीच्या डाळीचे आणि या डाळीच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या.
मटकीच्या डाळीतील पोषक तत्व
मटकीच्या डाळीमध्ये आणि याच्या पाण्यामध्ये प्रोटीन तर भरपूर असतंच सोबतच यात व्हिटॅमिन बी सुद्धा असतं. त्याशिवाय यात मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, पोटॅशिअम, फॉस्फोरस, मॅगनीझ, आयर्न, कॉपर, सोडिअम आणि झिंकसारखे तत्वही असतात.
काय होतात फायदे
1) मटकीच्या डाळीमध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे याचं नियमित सेवन केलं तर पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. लवकर भूक लागत नाही. याने होतं असं की, तुम्ही गरजेपेक्षा जास्त खाणार नाही आणि तुमचं वजनही वाढणार नाही.
2) प्रोटीनशिवाय या डाळीमध्ये फायबर भरपूर असतं ज्यामुळे तुम्हाला डायजेशनसंबंधी कोणत्याही समस्या होणार नाहीत. तसेच बद्धकोष्ठतेची समस्याही लगेच दूर होईल.
3) मटकीच्या डाळीचं नियमित सेवन केल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलही कमी होतं. त्यासोबतच या डाळीचं पाणी शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करतं. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात. ज्यामुळे किडनीही निरोगी राहते व यूरिन सिस्टीमही चांगलं राहतं.
4) मटकीच्या डाळीमध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फोरसही भरपूर असतं. जे हाडं मजबूत ठेवण्यासाठी मदत करतात. ऑस्टियोपोरोसिसच्या रूग्णांसाठी ही डाळ जास्त फायदेशीर ठरते.
5) आरोग्यासोबतच मटकीच्या डाळीने त्वचेलाही अनेक फायदे मिळतात. या डाळीमध्ये अॅंटी एजिंग तत्व असतात. याच्या नियमित सेवनाने त्वचा जास्त काळ तरूण राहते आणि चमकदार राहतं.
6) मटकीच्या डाळीमध्ये आयर्न भरपूर असतं. आयर्न रेड ब्लड सेल्स बनवण्यास मदत करतं आणि आयर्नच्या कमीमुळे होणाऱ्या एनीमियापासूनही बचाव होतो. शरीरात याने रक्तही वाढतं.
कसं कराल सेवन?
मटकीच्या डाळीची भाजी तुम्ही नियमितपणे सेवन करू शकता. तसेच याच्या पाण्याचंही सेवन करू शकता. यासाठी थोडी डाळ एका भांड्यात पाण्यात काही तास किंवा रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी भिजलेली डाळ गाळून वेगळी काढा. हे पाणी थेट पिऊ शकता किंवा यात थोडा लिंबाचा रसही टाकून सेवन करू शकता.