वजन कमी करणं ते बॉडी डिटॉक्स मूग डाळीच्या पाण्याचे फायदे, जाणून घ्या कसं कराल तयार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 10:31 AM2024-05-08T10:31:31+5:302024-05-08T10:32:33+5:30
अनेकांना हे माहीत नसतं की, या डाळीचं पाणी सेवन केल्यानेही अनेक फायदे होतात. याने डेंग्यूसारख्या आजाराचा धोकाही कमी केला जाऊ शकतो.
वेगवेगळ्या डाळी आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे तुम्हाला माहीत असेलच. त्यातही मूगाची डाळ ही शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर असते. कारण यात इतकेच पोषक तत्व असतात जे दुसऱ्या डाळींमध्ये नसतात. मूगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. त्यासोबतच मॅग्नीज, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फॉलेट, कॉपर, झिंक आणि व्हिटॅमिन्ससारखे पोषक तत्व असतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, या डाळीचं पाणी सेवन केल्यानेही अनेक फायदे होतात. याने डेंग्यूसारख्या आजाराचा धोकाही कमी केला जाऊ शकतो. चला जाणून घेऊ मूगाच्या डाळीचं पाणी तयार करण्याची पद्धत आणि त्यापासून होणारे फायदे....
मूग डाळीच्या पाण्यातील पोषक तत्व
एक कप मूग डाळीच्या पाण्यात प्रोटीन १४ ग्रॅम, फॅट १ ग्रॅम, फायबर १५ ग्रॅम, फॉलेट ३२१ मायक्रोग्रॅम, शुगर ४ ग्रॅम, कॅल्शिअम ५५ मि.लि., मॅग्नेशिअम ९७ मिली, झिंक ७ मिली असतं. त्यासोबतच या डाळीच्या पाण्यात व्हिटॅमिन बी१, बी५, बी६, थियामिन, डायटरी फायबर आणि रेजिस्टेंट स्टार्चही भरपूर असतं. त्यामुळे या डाळीतून शरीराला भरपूर पोषक तत्व मिळतात. ज्याने तुम्ही वेगवेगळ्या आजारांचा धोका कमी करू शकता.
लठ्ठपणा कमी होतो
अनियमित दिनचर्या आणि व्यस्तता यामुळे व्यक्तींना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. या समस्यांमध्ये लठ्ठपणा सर्वात जास्त बघायला मिळते. जर तुम्हीही लठ्ठपणाने हैराण असाल तर मूगाच्या डाळीचं सेवन करू शकता. या डाळीमध्ये कॅरीचं प्रमाण कमी आणि फायबर अधिक असतं. तसेच मूग डाळीच्या पाण्याने मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. याने वजन कमी करण्यास मदत मिळते.
विषारी तत्व बाहेर पडतात
मूग डाळीचं पाणी नियमित सेवन केल्याने शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत मिळते. याने शरीराची आतून स्वच्छता होते. सोबतच डाळीचं पाणी प्यायल्याने लिव्हर, गॉल ब्लॅडर, रक्त आणि आतड्यांची स्वच्छताही होते.
डायबिटीसमध्ये फायदेशीर
मूग डाळीचं पाणी शरीरात इन्सुलिनचं प्रमाण वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यासोबतच मूग डाळ ब्लड ग्लूकोजला नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. ज्याने डायबिटीस नियंत्रित ठेवण्यासही मदत मिळते.
डेंग्यूपासून बचाव
डेंग्यू डास चावल्याने होणारा एक गंभीर आजार आहे. अलिकडे तर या आजाराने सगळीकडेच थैमान घातलं आहे. अशात मूगाच्या डाळीचं पाणी सेवन केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. या डाळीचं पाणी सेवन करून इम्यून सिस्टम बूस्ट होतं, ज्याने डेंग्यूसारख्या गंभीर आजारापासून बचाव केला जाऊ शकतो.
मूग डाळीचं पाणी कमी करण्याची पद्धत
मूग डाळीचं पाणी तयार करण्यासाठी एका प्रेशर कुकरमध्ये दोन कप पाणी गरम करा. या गरम पाण्यात मूग डाळ टाका आणि चवीनुसार मिठ टाकून साधारण २ ते ३ शिट्या होईपर्यंत शिजवा. त्यानंतर डाळ चांगली बारीक करा. यातील पाणी वेगळं काढा. तुमचं डाळीचं पाणी पिण्यासाठी तयार आहे.