रोज सकाळी 'या' झाडाची १० ते १२ पाने खा, फायदे इतके की विचारही केला नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 11:24 AM2024-10-08T11:24:14+5:302024-10-08T11:25:09+5:30

Moringa leaves benefits :तुम्हाला शरीराच्या अनेक समस्या दूर करणारा एक आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. जो शरीराला तर अनेक फायदे देतोच सोबतच अनेक आजारांचा धोकाही कमी करतो.

Amazing Health Benefits Of Moringa leaves, know how to consume it | रोज सकाळी 'या' झाडाची १० ते १२ पाने खा, फायदे इतके की विचारही केला नसेल!

रोज सकाळी 'या' झाडाची १० ते १२ पाने खा, फायदे इतके की विचारही केला नसेल!

Moringa leaves benefits : आजकालच्या धावपळीच्या जीवनामुळे आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे व चुकीच्या लाइफस्टाईलमुळे लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत असतात. कमी वयातच ब्लड शुगर, कमजोर मेटाबॉलिज्म, लठ्ठपणा अशा गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशात आज आम्ही तुम्हाला शरीराच्या अनेक समस्या दूर करणारा एक आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. जो शरीराला तर अनेक फायदे देतोच सोबतच अनेक आजारांचा धोकाही कमी करतो.

शेवग्याच्या पानांचे फायदे

- शेवग्याच्या पानांच्या भाजीमध्ये आयर्न भरपूर असतं. ज्या लोकांना एनीमियाची समस्या आहे त्यांच्यासाठी ही भाजी रामबाण उपाय आहे.

- ज्या लोकांना थायरॉईडची समस्या आहे त्यांच्यासाठी शेवग्याच्या शेंगाची भाजी किंवा पानांची भाजी फायदेशीर असते. 

- तसेच ज्या हाय बीपीची समस्या आहे, त्यांच्यासाठीही शेवगा औषधासारखं काम करतो.

- शेवग्याच्या ज्यूसमध्ये कॅलरी कमी असतात आणि डायटरी फायबर भरपूर असतं. जे तुमच्या शरीरातील बॅड फॅट कमी करतं. व्हिटॅमिन सी मुळे शरीरातील इन्फेक्शन कमी होतं आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. 

- नियमितपणे शेवग्याचं सेवन केलं तर केस, त्वचा आणि हाडे मजबूत होतात. शेवग्याच्या सेवनाने नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजारांपासून बचाव होतो. याने लिव्हरवरील सूज कमी होते.

- तुम्ही शेवग्याची पाने चावून खाऊ शकता. तसेच याचं सूप किंवा भाजी बनवूनही सेवन करू शकता. त्याशिवाय सलाद किंवा चहामधूनही सेवन करू शकता.

इतरही फायदे

तरूण दिसाल

शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असतं. ज्याचा वापर पूर्वीपासून सौदर्यासाठी केला जातो. जर तुम्ही या शेवग्याच्या शेंगाचा आहारात नियमित समावेश कराल तर तुमच्यावर वाढत्या वयाची लक्षणे दिसणार नाही.

हाडं आणि दात मजबूत

शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असतात. ज्याने तुम्हाला हाडे मजबूत करण्यास मदत मिळते. तसेच दातही मजबूत होतात. म्हणूनच लहान मुलांना या शेंगांची भाजी देणं फायदेशीर मानलं जातं.

लठ्ठपणा कमी करा

लठ्ठपणा आणि शरीराची वाढलेली चरबी दूर करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा एक फायदेशीर उपाय मानला जातो. यात फॉस्फोरस भरपूर प्रमाणात आढळतं जे शरीरातील अतिरिक्त कॅलर कमी करतं आणि सोबतच चरबी कमी करून तुमचा लठ्ठपणाही दूर करतं.

रक्त शुद्ध होतं

शेवग्याच्या पानांप्रमाणेच त्यांच्या शेंगामध्ये देखील रक्ताचे शुद्धीकरण करण्याची क्षमता असते. त्यामुळे हे शरीरात अ‍ॅंटी-बायोटीक एजंट म्हणून काम करते. त्यामुळे रक्तातील विषारी पदार्थ वाढल्याने होणारा अ‍ॅक्नेचा त्रास, त्वचाविकार कमी करण्यास शेवग्याच्या शेंगा फायदेशीर ठरतात.

शुगर नियंत्रणात ठेवा

शेवग्याच्या शेंग्यांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. परिणामी मधूमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच पित्ताशयाचे कार्य सुधारण्यासही शेंग़ा फायदेशीर ठरतात. त्यामुळे शरीराचे कार्य आणि स्वास्थ्यही सुधारतं. 

Web Title: Amazing Health Benefits Of Moringa leaves, know how to consume it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.