एखाद्या रामबाण औषधासारखं काम करतो हा मसाला, फायदे वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 04:49 PM2024-09-06T16:49:59+5:302024-09-06T16:50:51+5:30
Anise Benefits : मसाल्यांनी पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबत आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. असाच एक खास मसाला म्हणजे चक्रफूल.
Anise Benefits : भारतीय किचनमध्ये वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढवण्यासाठी केला जातो. गरम मसाल्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असतो. मसाल्यांनी पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबत आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. असाच एक खास मसाला म्हणजे चक्रफूल.
याची तिखट आणि गोडसर टेस्ट अनेकांना आवडते. पण अनेकांना याचे आरोग्याला होणारे फायदे माहीत नसतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आयुर्वेदात अनेक उपचारांमध्ये चक्रफुलाचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. हे फूल एखाद्या औषधासारखं आहे. चला जाणून घेऊ याच्या वापराची पद्धत आणि फायदे...
- चक्रफुलाच्या सेवनाने पचन तंत्राला फार फायदे होतात. याने पोटाच्या समस्या जसे की, गॅस, अपचन आणि पाइल्स दूर होण्यास मदत मिळते. यातील अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण पोटदुखी करण्यास फायदेशीर असतं.
- स्टार ऐनिस म्हणजे चक्रफुलामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट गुण असतात जे शरीराचा नुकसानकारक फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात. याने कॅन्सरचा धोकाही कमी होतो.
- चक्रफुलाचं सेवन केल्याने वय वाढण्याची प्रक्रिया हळुवार होते आणि शरीरातील कोशिकांना सुरक्षा देते.
- चक्रफुलामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्व असतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. तसेच सर्दी-खोकला आणि इतर इन्फेक्शनपासून बचाव करण्यासही मदत करतात.
- चक्रफुलामधील अॅंटी-मायक्रोबिअल गुण बॅक्टेरिया आणि वायरससोबत लढण्यास मदत करतात. याने नॅचरल पद्धतीने इन्फेक्शनपासून बचाव केला जातो.
- या फुलामध्ये एस्ट्रीगोल नावाचं तत्व असतं जे हार्मोनमध्ये संतुलन ठेवण्यास मदत करतं. याने मासिक पाळी दरम्यानच्या समस्या कमी होतात.
कसा कराल याचा वापर?
चक्रफुलाचं सेवन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. हे तुम्ही चहा, सूप आणि भाजीत टाकू शकता. तसेच रोज सकाळी रिकाम्या पोटी हे फूल पाण्यात उकडून ते पाणी सेवन केल्यासही फायदा मिळतो.