चिंचेप्रमाणेच चिंचेची पानेही आरोग्यासाठी फायदेशीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 04:38 PM2018-07-19T16:38:19+5:302018-07-19T16:38:32+5:30
चिंच म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. याची आंबट गोड चव सर्वांनाच आवडते. तसं पहायला गेलं तर चिंच आरोग्यासाठी लाभदायक असते. परंतु चिंचाप्रमाणेच चिंचेच्या पानांचाही शरीराला फायदा होतो.
चिंच म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. याची आंबट गोड चव सर्वांनाच आवडते. तसं पहायला गेलं तर चिंच आरोग्यासाठी लाभदायक असते. परंतु चिंचाप्रमाणेच चिंचेच्या पानांचाही शरीराला फायदा होतो. चिंचेच्या पानांचा तुम्ही अनेक विकार दूर करण्यासाठी उपयोग करू शकता. जाणून घेऊयात चिंचेच्या झाडाच्या पानांचे फायदे...
- तुम्हाला जर जखम झाली असेल तर त्यावर चिंचेच्या पनांचा रस लावा. त्यामुळे जखम लवकर बरी होते. त्याचबरोबर याच्या पानांचा रस जखमेवर होणाऱ्या इन्फेक्शनपासून बचाव करतो.
- चिंचेची पाने महिलांसाठीही लाभदायक असतात. चिंचेच्या पानांचा अर्क स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी गुणकारी असतो. त्यामुळे दुधाच्या गुणवत्तेत सुधारणा होते.
- चिंचेच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. त्याचा त्वचेला, केसांना फायदा होतो. तसेच यामुळे शरिरातील रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
- चिंचेच्या पानांच्या मदतीने शरिराला आलेली सूज कमी करू शकता. तसेच सांधेदुखीवरही चिंचेची पानं गुणकारी ठरतात.
- तुमच्या शरीरात कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन झालं असेल तर चिंचेची पानं खाल्यानं तुम्हाला आराम मिळेल. किंवा तुम्ही चिंचेच्या पानांचा रसही घेऊ शकता.
- चिंचेची पानं खाल्याने अल्सरची समस्याही दूर होते. अल्सर झाल्यावर होणाऱ्या प्रचंड वेदनांवर चिंचेची पानं खाल्यानं आराम मिळतो.
- यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी व्हिटॅमिन ए मदत करते.