पावसाळ्यात माशा घरभर फिरून तुम्हाला त्रास देतात?; 'हे' सोपे उपाय करा अन् बाहेर पळवून लावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 17:38 IST2024-07-24T17:37:20+5:302024-07-24T17:38:08+5:30
काही सोप्या उपायांनी तुम्ही माशांपासून सुटका करू शकता. या उपायांबद्दल जाणून घेऊया...

फोटो - CANVA
पावसाळ्यात जवळपास प्रत्येक घरात माशा फिरतात. त्या घरात ठेवलेल्या अन्नावर बसतात, त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोकाही वाढतो. यापासून सुटका करण्यासाठी लोक विविध उपाय करतात, पण तरीही माशा पळून जात नाहीत. अशा परिस्थितीत काही सोप्या उपायांनी तुम्ही या माशांपासून सुटका करू शकता. या उपायांबद्दल जाणून घेऊया...
कापूर
घरातून माशा दूर करण्यासाठी कापूर वापरता येऊ शकतो. यासाठी कापूरचा तुकडा घ्या, तो चमच्यात ठेवा आणि जाळा. त्याचा धूर घरभर पसरला की घरातील माशा लगेच बाहेर पळून जातील.
मीठ-लिंबू
मीठ-लिंबू देखील माशा दूर करण्यासाठी प्रभावी आहे. यासाठी तुम्हाला १ लिंबू, २ चमचे मीठ आणि १ ग्लास पाणी घ्यावं लागेल. एक लिंबू कापून एका ग्लास पाण्यात पिळून त्यात मीठ टाका. आता या गोष्टी मिक्स करा आणि बाटलीत ठेवा आणि माशा असतील तिथे स्प्रे मारा. सर्व माशा पळून जातील.
ऍपल सायडर व्हिनेगर
ऍपल सायडर व्हिनेगर आणि पाणी चांगलं मिसळा. नंतर हे बाटलीत भरून घरभर शिंपडा. यामुळे घरातील माशा लवकर बाहेर निघून जातील.
तमालपत्र
तमालपत्र माशांपासून बचाव करण्यासाठी वापरलं जातं. तमालपत्र जाळून त्याचा धूर ज्या ठिकाणी माशा आहेत त्या ठिकाणी सोडा. यामुळे माशा जातील.
फिनाईल
लादी पुसताना पाण्यात थोडं फिनाईल मिसळा. माशा पळवण्याची ही एक अतिशय प्रभावी आणि जुनी पद्धत आहे.