Corona Virus : "गर्भातील बाळालाही कोरोनाचा धोका, करतोय ब्रेन डॅमेज"; रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 02:23 PM2023-04-09T14:23:00+5:302023-04-09T14:32:06+5:30
Corona Virus : मुलांना जन्म देणाऱ्या महिलांना कोरोना संसर्ग झाल्याचे पुरावे आढळून आले आहेत.
कोरोनाने थैमान घातले आहे. संशोधक सुरुवातीपासूनच कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या परिणामांवर दावे करत आहेत. हळूहळू त्यांचे म्हणणे खरे ठरत आहे. आता असे समोर आले आहे की अमेरिकेतील कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलांच्या मुलांचे ब्रेन डॅमेज झाल्याचे आढळून आले आहे. गर्भधारणेदरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
पीडियाट्रिक्स जर्नलमध्ये एक रिपोर्ट प्रकाशित झाला आहे, ज्यामध्ये मियामी विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले की, मुलांच्या मातांना दुसऱ्या तिमाहीत संसर्ग झाला होता. 2020 मध्ये, लस सुरू होण्यापूर्वी डेल्टा प्रकाराची लागण झाली होती, जेव्हा संसर्ग खूप जास्त होता. संशोधकांनी दावा केला की, मुलांना जन्मावेळी त्रास झाला आणि नंतर त्यांच्यामध्ये काही तक्रारीही दिसून आल्या
ब्रेन डॅमेजसह जन्मलेल्या दोन मुलांपैकी एकाचा 13 महिन्यांत मृत्यू झाला, तर दुसऱ्याला होसपाइस केअरमध्ये ठेवण्यात आले. मियामी विद्यापीठातील बालरोगतज्ञ आणि सहाय्यक प्राध्यापक डॉ. मर्लिन बेनी यांनी सांगितले की, कोणत्याही मुलांना कोरोनाची लागण झालेली नाही. त्याच्या शरीरात कोविड अँटीबॉडी आढळून आली. संशोधकांनी सांगितले की यावरून असे सूचित होते की संसर्ग गर्भवती महिलांच्या नाळेमध्ये आणि नंतर मुलांमध्ये प्रवेश करू शकतो. त्यामुळे मुलांच्या मेंदूलाही इजा होऊ शकते.
संशोधकांनी सांगितले की, मुलांना जन्म देणाऱ्या महिलांना कोरोना संसर्ग झाल्याचे पुरावे आढळून आले आहेत. मुलांच्या मेंदूमध्येही व्हायरसच्या खुणा आढळल्या, ज्यावरून असे सूचित होते की संसर्गामुळेच मेंदूचे नुकसान झाले आहे. या महिलांनी गरोदर असताना कोरोना चाचणी केली होती, ज्यामध्ये त्या पॉझिटिव्ह आढळल्या. त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणे आढळून आली.
गर्भवती महिलांना तज्ज्ञांचा सल्ला
कुटुंब नियोजन करणाऱ्या महिलांना संशोधकांनी काही सल्लाही दिला आहे. अशी प्रकरणे दुर्मिळ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मियामी विद्यापीठातील स्त्रीरोगतज्ञ डॉ शहनाज दुआरा यांनी कोरोनाच्या काळात गर्भवती झालेल्या महिलांना सल्ला दिला आहे की त्यांनी आपल्या मुलांना बालरोगतज्ञांना दाखवावे. मुलामध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार आढळल्यास ती 7-8 वर्षात बरी होऊ शकते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"