Monkeypox : अमेरिकेत आढळला 'मंकीपॉक्स'चा पहिला रुग्ण; काय आहे या आजाराची लक्षणे? जाणून घ्या, सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 12:59 PM2021-07-17T12:59:59+5:302021-07-17T13:26:56+5:30

Monkeypox : रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या (सीडीसी) मते, मंकीपॉक्स हा एक दुर्मीळ आजार आहे. हा आजार अमेरिकेत राहणाऱ्या एका व्यक्तीला झाला आहे.

america monkeypox threat of new disease first case surfaced in america all you need to know | Monkeypox : अमेरिकेत आढळला 'मंकीपॉक्स'चा पहिला रुग्ण; काय आहे या आजाराची लक्षणे? जाणून घ्या, सविस्तर...

Monkeypox : अमेरिकेत आढळला 'मंकीपॉक्स'चा पहिला रुग्ण; काय आहे या आजाराची लक्षणे? जाणून घ्या, सविस्तर...

Next

टेक्सास : देशासह जगातील कोरोना व्हायरसचा धोका अद्याप संपलेला नाही. अनेक देशांमध्ये कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. तसेच, कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचेही म्हटले आहे. यातच, आता अमेरिकेतून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. याठिकाणी मंकीपॉक्स (Monkeypox) या नवीन आजाराचा पहिला रुग्ण आढळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंकीपॉक्सचा हा पहिला रुण टेक्सासमध्ये (Texas) आढळला आहे.

रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या (सीडीसी) मते, मंकीपॉक्स हा एक दुर्मीळ आजार आहे. हा आजार अमेरिकेत राहणाऱ्या एका व्यक्तीला झाला आहे. हा व्यक्ती गेल्या काही दिवसांपूर्वी नायजेरियाहून ते अमेरिकेत आला होता. हा रुग्णाला डलासमध्ये रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डलास काउंटीचे आरोग्य अधिकारी क्ले जेनकिन्स यांच्या म्हणण्यानुसार, हा आजार दुर्मीळ आहे, परंतु सध्या आपल्याला कोणताही मोठा धोका दिसत नाही. आम्हाला आत्ता वाटत नाही की, यामुळे सर्वसामान्यांना आता कोणताही धोका आहे.


सीडीसीच्या म्हणण्यानुसार, नायजेरिया व्यतिरिक्त 1970 च्या दशकापासून मध्य आणि पश्चिम आफ्रिकन देशांमध्ये या आजाराची प्रकरणे नोंदवली जात आहेत. यापूर्वी 2003 मध्ये अमेरिकेत या आजाराची काही प्रकरणे आढळली होती. याचबरोबर, सीडीसीने सांगितले की, त्यांचे अधिकारी संबंधीत विमान कंपनी आणि स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क करत आहोत. कारण, विमानातून प्रवास करणारे इतर प्रवासी आणि लोकांची तपासणी करता येईल.

मंकीपॉक्स हा चेचक व्हायरसशी संबंधित आजार आहे. हा आजार दुर्मीळ आहे. परंतु हा व्हायरल आजार असू शकतो. याची सहसा फ्लूसारखी लक्षणे आहे आणि लिम्फ नोड्सला सूज येऊ शकते. तसेच, हळूहळू चेहऱ्यावर आणि शरीरावर पुरळ उठणे सुरू होते. चिंतेची बाब अशी आहे की, मंकीपॉक्स हा रोग श्वसनाद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतो. दरम्यान, अमेरिकेत आढळलेल्या पहिल्या घटनेच्या संदर्भात चांगली गोष्ट अशी आहे की, कोरोना महामारीमुळे बहुतेक प्रवासी मास्क घातलेले होते, त्या विमानातील इतर लोकांपर्यंत मंकीपॉक्स हा पोहोचला असण्याची शक्यता फारच कमी आहे.

Web Title: america monkeypox threat of new disease first case surfaced in america all you need to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.