जिम आजच बंद करा, कारण जिमला जाणाऱ्यांपेक्षाही न जाणारे ठरले जास्त फिट!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 11:55 AM2018-11-28T11:55:30+5:302018-11-28T11:57:31+5:30
सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये स्वत:ला फिट ठेवणे एक आव्हानच झालं आहे. त्यामुळे अनेकजण फिट राहण्यासाठी जिमचा मार्ग निवडतात.
(Image Credit : woman.thenest.com)
सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये स्वत:ला फिट ठेवणे एक आव्हानच झालं आहे. त्यामुळे अनेकजण फिट राहण्यासाठी जिमचा मार्ग निवडतात. खासकरुन शहरांमध्ये जिमची फारच क्रेझ वाढलेली बघायला मिळते. पण आता एका शोधातून असा एक खुलासा करण्यात आला आहे, जो वाचून तुम्ही जिमला जाणे बंद करु शकता. कारण या शोधातून खुलासा करण्यात आला आहे की, जे लोक जिममध्ये जाऊन एक्सरासाइज करणाऱ्यांपेक्षा पायी चालणारे आणि धावणारे लोक जास्त फिट राहतात.
नुकताच हा अभ्यास अमेरिकन कॅन्सर सोसायटीकडून करण्यात आला. यात समोर आले की, जे लोक आठवडाभरात किमान सहा तास पायी चालतात, त्यांचं आयुष्य वाढतं. मृत्यूचा धोका हा तर सतत डोक्यावर गिरक्या घालत असतो. पण जे लोक ब्रिस्क वॉक म्हणजेच वेगाने चालतात, त्यांचं आयुष्य ३२ टक्के अधिक वाढण्याची शक्यता असते.
अल्पा पटेल या अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या स्ट्रॅटेजिक निर्देशिका आहेत. त्यांनी सांगितले की, रोज वॉक केल्याने तुमच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे बदल होतात. महत्त्वाची बाब म्हणजे ही एक्सरसाइज कुठेही केली जाऊ शकते. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याचाही गरज पडत नाही.
या अभ्यासाला खरं मानलं तर फिट राहण्यासाठी तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज नाहीये. पायी चालणे किंवा केवळ धावल्यानेही तुम्ही फिटनेसची काळजी घेऊ शकता. याने एकतर तुम्ही फिटही रहाल, सोबतच तुमची पैशांची बचतही होईल. त्यामुळे वाट बघत बसण्यापेक्षा चालायला आणि धावायला लागाल तर फायदा तुमचाच जास्त होईल.
त्यामुळे फिटनेसची इतकी काळजी असेल तर लगेच चालायला लागा, चालायला लागा म्हणजे तसं चालायला नाही तर फिटनेसच्या दृष्टीकोनातून चालायला लागा.