वैज्ञानिकांचा दावा दररोज हे एक फळ खाल्ल्याने कमी होईल रक्तात जमा झालेलं कोलेस्ट्रॉल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 06:14 PM2022-07-11T18:14:07+5:302022-07-11T18:15:02+5:30
Avocado Benefits: मायो क्लीनिकनुसार, हाय कोलेस्ट्रॉलची कोणतीही लक्षणे दिसत नाही. याची माहिती केवळ रक्त चेक केल्यावरच मिळते. त्यामुळेच डॉक्टर नियमितपणे रक्ताची चाचणी करण्याचा सल्ला देतात.
Avocado Benefits: कोलेस्ट्रॉल (cholesterol) तुमच्या शरीरातील एक गरजेचा पदार्थ आहे. कोलेस्ट्रॉलची निर्मिती लिव्हर करतं. पण काही पदार्थांमधूनही याची निर्मिती होते. कोलेस्ट्रॉलची शरीरात काही प्रमाणात गरज असते. पण जर शरीरात याचं प्रमाण वाढलं तर याने अनेक समस्या निर्माण होतात. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं तर हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. ज्या लोकांना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असते त्यांना आहारात बदल करण्याचा सल्ला दिला जातो. अशात जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर एवोकाडो फळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.
मायो क्लीनिकनुसार, हाय कोलेस्ट्रॉलची कोणतीही लक्षणे दिसत नाही. याची माहिती केवळ रक्त चेक केल्यावरच मिळते. त्यामुळेच डॉक्टर नियमितपणे रक्ताची चाचणी करण्याचा सल्ला देतात.
रक्तात कोलेस्ट्रॉल कसं जमा होतं?
अनहेल्दी डाइट
लठ्ठपणा
शारीरिक हालचाल कमी असणे
मद्यसेवन
किडनीचा जुना आजार
डायबिटीस
एचआयवी/एड्स
हाइपोथायरायडिज्म
एवोकाडो बॅड कोलेस्ट्रोलला नष्ट करतं
अमेरिकन हार्ट असोसिएश द्वारे प्रकाशित एका रिसर्चनुसार, दररोज एक एवोकाडो फळाचं सेवन केलं तर तुमच्या रक्तात जमा होणारं बॅड कोलेस्ट्रॉल कमी केलं जाऊ शकतं. या फळाला बटर फ्रूट असंही म्हटलं जातं. यात असलेल्या पोषक तत्वांमुळे आणि याच्या फायद्यांमुळे हे फळ सुपर फुडच्या लिस्टमध्ये सामिल आहे.
एवोकाडोतील पोषक तत्व
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबतच एवोकाडोमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन K, फोलेट, व्हिटॅमिन बी -6, फाइबर आणि इतरही अनेक तत्व असतात. यात आयोडीन, प्रोटीन, खनिज तत्व, फॅटी एसिड, कॅल्शियम, लोह, मॅग्नीशियम, पोटॅशियम, तांबे, मॅगनीज, फॉस्फोरस, जस्ता, व्हिटॅमिन सी हे तत्वही आढळतात.