Corona Vaccination : दिलासादायक! 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी लस तयार; 'या' अमेरिकन फार्मा कंपनीने मागितली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 02:58 PM2022-02-02T14:58:27+5:302022-02-02T14:59:10+5:30

Corona Vaccination : अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने (FDA) फायझर आणि सहयोगी कंपनी बायोएनटेक (BioNtech) यांना पूर्वनियोजित कार्यक्रमापूर्वी अर्ज करण्यास सांगितले होते.

American pharma company pfizer sought permission to start vaccination for children | Corona Vaccination : दिलासादायक! 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी लस तयार; 'या' अमेरिकन फार्मा कंपनीने मागितली परवानगी

Corona Vaccination : दिलासादायक! 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी लस तयार; 'या' अमेरिकन फार्मा कंपनीने मागितली परवानगी

Next

वॉशिंग्टन : फार्मा कंपनी फायझरने (Pfizer) अमेरिकेला 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी कोविड-19 लस मंजूर करण्यास सांगितले आहे, जेणेकरून लहान अमेरिकन मुलांसाठीही लसीकरण मार्चमध्ये सुरू होऊ शकेल. दरम्यान, अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने (FDA) फायझर आणि सहयोगी कंपनी बायोएनटेक (BioNtech) यांना पूर्वनियोजित कार्यक्रमापूर्वी अर्ज करण्यास सांगितले होते.

अमेरिकेत 5 वर्षाखालील 1.9 कोटी मुले आहेत, त्यांना कोरोना विषाणूविरूद्ध लसीकरण करण्यात आले नाही. त्याचबरोबर, अनेक पालक आपल्या मुलांना लसीकरण करून घेण्याचा आग्रह धरत आहेत. विशेषतः अशा वेळी जेव्हा ओमायक्रॉन संसर्गामुळे विक्रमी संख्येने मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. एफडीएने मान्यता दिल्यास फायझर लस 6 महिन्यांपर्यंतच्या मुलांना देखील दिली जाऊ शकते. या लसींचा डोस वयस्कर लोकांना दिलेल्या डोसच्या एक दशांश आहे.

फायझरने म्हटले आहे की,  एफडीएला डेटा देण्यास करण्यास सुरुवात केली आहे आणि काही दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या मुलांना किती डोस द्यावे लागतील, हा एक मोठा प्रश्न आहे. सुरुवातीच्या चाचणीमध्ये, 2 डोस लहान मुलांसाठी पुरेसे मानले गेले होते, परंतु शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांसाठी ते पुरेसे नव्हते. फायझर 3 डोसची चाचणी करत आहे आणि मार्च अखेरपर्यंत अंतिम आकडेवारी अपेक्षित आहे.

5 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये ओमायक्रॉनची बाधा
ओमायक्रॉनची लागण झालेल्या मुलांची संख्या जास्त असल्याने एफडीएने फायझरला अर्ज करण्यास सांगितले होते. एफडीएच्या प्रवक्त्याने सांगितले की 5 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये ओमायक्रॉन प्रकारांची नोंद झाली आहे. एफडीएचा अंतिम निर्णय काही महिन्यांत येऊ शकतो, परंतु हा एकमेव अडथळा नाही आहे. फायझरला रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांकडून देखील मान्यता घ्यावी लागेल.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष जो बाडयन यांचे प्रशासन मुलांसाठी अँटी-कोविड -19 लसीचे डोस मंजूर करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न करत आहे. या वयोगटातील शाळा पुन्हा सुरू करून त्या खुल्या ठेवण्यासाठी लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे, असा त्यांचा युक्तिवाद आहे.

Web Title: American pharma company pfizer sought permission to start vaccination for children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.