अमेरिकी शास्त्रज्ञांकडून रक्तदाबाबद्दल उपाय सुचविणारे यंत्र विकसित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 11:59 PM2018-10-07T23:59:54+5:302018-10-08T00:06:57+5:30
व्यक्तीच्या रक्तदाबाचे प्रमाण किती आहे याची अचूक माहिती देणारे तसेच ते सामान्य पातळीवर आणण्यासाठी नेमके काय करावे याचा वैयक्तिक सल्ला देणारे एक यंत्र अमेरिकी शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. हे यंत्र फिटनेस बँडप्रमाणे शरीरावर बाळगता येईल.
न्यूयॉर्क : व्यक्तीच्या रक्तदाबाचे प्रमाण किती आहे याची अचूक माहिती देणारे तसेच ते सामान्य पातळीवर आणण्यासाठी नेमके काय करावे याचा वैयक्तिक सल्ला देणारे एक यंत्र अमेरिकी शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. हे यंत्र फिटनेस बँडप्रमाणे शरीरावर बाळगता येईल.
या संशोधनात सहभागी असलेले कॅलिफोर्निया विद्यापीठातील इलेक्ट्रिकल व कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक सुजीत डे यांनी सांगितले की, एखाद्या विशिष्ट सवयीमुळे रक्तदाब वाढत किंवा कमी होत असेल तर ती गोष्ट टाळण्याची सूचना आपल्याला एखाद्या यंत्राद्वारे लगेच मिळाली तर ती व्यक्ती लगेच सतर्क होऊ शकते.
८ रुग्णांचा नव्वद दिवसांतील रक्तदाब, ते किती तास झोपतात, कोणता व्यायाम करतात याची सारी माहिती या यंत्राच्या मदतीने अमेरिकी शास्त्रज्ञांनी गोळा केली. त्यावेळी या यंत्राने संबंधिताला आरोग्याविषयी दिलेला इशारा खूपच उपयोगी पडला. यंत्रातील माहिती रक्तदाब रुग्णाच्या डॉक्टरला तात्काळ उपलब्ध होईल.