पांढरे केस काळे करण्यासाठी अमेरिकन वापरत आहे 'हा' खास उपाय, चीनमध्येही होतो वापर...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 10:34 AM2024-03-18T10:34:11+5:302024-03-18T10:34:35+5:30

अमेरिकेतील लोकांचं मत आहे की, कलरने केस खराब होतात. त्यामुळे ते आशियाई देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक चिकित्सा पद्धतींकडे वळले आहेत.

Americans using black sesame seeds molasses onion juice and coconut oil for stop white hair | पांढरे केस काळे करण्यासाठी अमेरिकन वापरत आहे 'हा' खास उपाय, चीनमध्येही होतो वापर...

पांढरे केस काळे करण्यासाठी अमेरिकन वापरत आहे 'हा' खास उपाय, चीनमध्येही होतो वापर...

वय जास्त झाल्यावर केस पांढरे होणं सामान्य आहे. पण कमी केस पांढरे होणं जरा विचित्र आहे. कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या जगभरातील लोकांना होत आहे. YouGov च्या एका रिपोर्टनुसार, अमेरिकेत एक तृतीयांश तरूणांना ही समस्या होत आहे. 30 पेक्षा कमी वयात त्यांचे केस पांढरे होत आहेत. अशात लोक सरकारकडे केस पांढरे होणं रोखण्यासाठी एखादं औषध आणण्याची मागणी करत आहेत. जपान-दक्ष‍िण कोरियासहीत अनेक आशियाई देशांमध्ये ही कॉमन समस्या आहे. अशात अमेरिकन लोकांना एक फॉर्मूला दिसला. त्यांचा दावा आहे की, याने केस कधीच पांढरे होणार नाहीत.

केस काळे ठेवण्यासाठी बरेच लोक केसांना कलर करतात. पण अमेरिकेतील लोकांचं मत आहे की, याने केस खराब होतात. त्यामुळे ते आशियाई देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक चिकित्सा पद्धतींकडे वळले आहेत. डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, बरेच तरूण बरेच तरूण काळे तिळ आणि गुळाचा वापर करत आहेत. ते रोज सकाळी हे खातात. त्यांच्या नाश्त्यात याचा समावेश असतो. यांचा चीनमध्ये केस काळे ठेवण्यासाठी पारंपारिक पद्धतीने वापर केला जातो. तसेच काही तरूण कांद्याचा रस आणि खोबऱ्याचं तेल केसांवर लावत आहेत. त्यांचं मत आहे की, याने केस कधीच पांढरे होणार नाहीत.

पांढरे केस होतात काळे

काळ्या तिळाला चीनमध्ये हेई ज़ी मा नावाने ओळखलं जातं. चीनी लोकांचं मत आहे की, याने पांढरे केस काळे होतात. गुळाला चीनमध्ये क्यूई म्हणतात. याने ब्‍लड सर्कुलेशन वाढतं. अशी मान्यता आहे की, केस निरोगी ठेवण्यासाठी कांद्याचा रस दक्षिण आशियाई आयुर्वेद चिकित्सेत हीटवेव दूर करण्यासाठी सगळ्यात जास्त वापरला जातो. कांद्यात सल्फर भरपूर असल्याने याने केस मजबूत होतात आणि केस पांढरेही होत नाहीत.

खोबऱ्याचं तेल

अमेरिकन लोक सध्या खोबऱ्याच्या तेलाचाही भरपूर वापर करत आहेत. कारण त्यांना वाटतं की, याने डोक्यातील ब्लड सर्कुलेशन चांगलं राहतं. याने केसांचा रंग हळूहळू पांढऱ्याचा काळा होतो. याने केस पांढरे होत नाहीत. 

बऱ्याच लोकांचं असंही मत आहे की, तरल क्लोरोफिल तांब्याच्या भांड्यात ठेवल्यावर काही वेळाने केसांवर लावलं तर याने केस पांढरे होत नाहीत. मॉन्ट्रियलमध्ये राहणारी फेमस गायिका रोसमारिया ला पोस्टा केवळ 31 वर्षाची आहे. पण तरीही ती आपले केस नेहमी काळे ठेवण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील क्लोरोफिलचा वापर करत आहे. 
 

Web Title: Americans using black sesame seeds molasses onion juice and coconut oil for stop white hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.