कोणत्या लोकांनी चुकूनही खाऊ नये आवळा, बसू शकतो मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 11:35 AM2023-11-06T11:35:37+5:302023-11-06T11:38:06+5:30

Amla Side Effects : सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे याने इम्यूनिटीही बूस्ट होते. पण काही लोकांसाठी आवळा खाणं महागात पडू शकतं.

Amla gooseberry superfood benefits side effects winter season | कोणत्या लोकांनी चुकूनही खाऊ नये आवळा, बसू शकतो मोठा फटका

कोणत्या लोकांनी चुकूनही खाऊ नये आवळा, बसू शकतो मोठा फटका

Amla Side Effects : हिवाळ्यात बाजारात वेगवेगळी सीजनल फळं दिसू लागतात. त्यात आवळाही असतो. या दिवसात लोक आवळ्यांचा मनमुराद आनंद घेतात. खास बाब म्हणजे या दिवसात आवळ्याचे आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. आवळ्यांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं. ज्यामुळे केस मजूबत होतात, डोळ्यांची दृष्टी चांगली होते आणि त्वचेलाही याचे अनेक फायदे मिळतात. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे याने इम्यूनिटीही बूस्ट होते. पण काही लोकांसाठी आवळा खाणं महागात पडू शकतं. चला जाणून घेऊ कुणी आवळे खाणं टाळलं पाहिजे.

किडनी रूग्ण

जे लोक किडनीच्या समस्येने पीडित आहेत त्यांनीही आवळ्याचं सेवन अजिबात करू नये. याचं कारण म्हणजे आवळ्याचं सेवन केल्याने शरीरात सोडिअमचं प्रमाण वाढतं. जे फिल्टर करणं किडनीसाठी अवघड होऊन जातं. अशात किडनी फेल्युअरची वेळही येऊ शकते.

सर्दी-खोकला

आवळा थंड असतो. त्यामुळे सर्दी, खोकला किंवा ताप असलेल्या लोकांनी आवळ्याचं सेवन करणं टाळलं पाहिजे. जर तब्येत बरी नसतानाही तुम्ही याचं सेवन करत असाल तर तुमचं बॉडी टेंपरेचर आणखी कमी होऊ शकतं. ज्यामुळे तुम्हाला आणखी समस्येचा सामना करावा लागू शकतो.

लो ब्लड शुगर

जे लोक वेगवेगळ्या कारणांनी अॅंटी-बायोटिक औषधांचं सेवन करतात, त्यांनीही आवळा खाणं टाळलं पाहिजे. त्यासोबतच लो ब्लड शुगर असलेल्या रूग्णांनीही याचं सेवन करू नये. असं केल्याने तुमची तब्येत आणखी बिघडू शकते. 

सर्जरी आधी

जर एखाद्या रूग्णावर कोणत्याही प्रकारची सर्जरी होणार असेल तर ऑपरेशनच्या दोन आठवड्याआधी आवळ्याचं सेवन बंद केलं पाहिजे. असं केलं नाही तर तुमच्या धमण्या फुटू शकतात आणि ब्लीडिंगचा धोका वाढतो.

Web Title: Amla gooseberry superfood benefits side effects winter season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.