फिटनेससाठी धावणं गरजेचं आहेच, पण त्याहून गरजेचं आहे किती धावावं हे जाणून घेणं!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 11:57 AM2019-11-30T11:57:11+5:302019-11-30T12:10:09+5:30

चांगल्या आरोग्यासाठी आणि फिट राहण्यासाठी लाइफस्टाईलमध्ये रोज एक्सरसाइज करणं फार गरजेचं आहे.

Amount of running for good health | फिटनेससाठी धावणं गरजेचं आहेच, पण त्याहून गरजेचं आहे किती धावावं हे जाणून घेणं!

फिटनेससाठी धावणं गरजेचं आहेच, पण त्याहून गरजेचं आहे किती धावावं हे जाणून घेणं!

googlenewsNext

(Image Credit : business-standard.com)

चांगल्या आरोग्यासाठी आणि फिट राहण्यासाठी लाइफस्टाईलमध्ये रोज एक्सरसाइज करणं फार गरजेचं आहे. त्यातल्या त्यात तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर एक्सरसाइज आणि रनिंग करणं अधिक महत्वाचं आहे. मुळात रनिंग वजन कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी फायदेशीर ठरते हे सर्वांनाच माहीत आहे. पण अनेकांना हे माहीत नसतं की, किती रनिंग करावी. चला जाणून घेऊ याचं उत्तर....

(Image Credit : sciencemag.org)

२०१५ मध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, दररोज ५ ते १० मिनिटे रनिंग केल्याने तुमच्या हृदयाचा वेगवेगळ्या आजारांपासून बचाव होतो. त्यानंतर ज्या लोकांनी रनिंगवर अधिक फोकस केल्यावर हार्टमुळे होणाऱ्या मृत्यूदरात २८ टक्के कमतरता बघायला मिळाली.

(Image Credit : runningschool.com)

म्हणजे या रिसर्चमधून हे तर नक्कीच स्पष्ट होतं की, चांगल्या आरोग्यासाठी रनिंग करणं गरजेचं आहे. पण त्यासोबतच किती रनिंग केली पाहिजे हेही जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. कारण रनिंगचा अति स्पीड तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्याऐवजी बिघडवूही शकते. 

(Image Credit : popsugar.com.au)

या रिसर्चमध्ये लोकांना हे सांगण्यात आलं आहे की, तुम्ही आठवड्यातून कमीत कमी ४.५ तास रनिंग करणे गरजेचं आहे. तसेच आणखी एका दुसऱ्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, रोज ४० ते ६० मिनिटे रनिंग केल्याने संपूर्ण शरीराची एक्सरसाइज होते. त्यामुळे नियमितपणे रनिंग करावी.

धावण्याचे होणारे फायदे

बौद्धिक आरोग्य :

उतार वयात वाढत्या वयानुसार आपली बौद्धिक क्षमता आणि आरोग्या कमी होऊ लागते. अल्झायमर्ससारखा आजार तर फार कॉमन आहे. त्यामुळे मेंदूच्या पेशींची क्षमता घटते. पळण्यामुळे अल्झायमर्स जरी बरा होत नसला तरी पेंशीचे घट रोखण्यामध्ये त्यामुळे खूप मदत होते.

तणावमुक्ती :

आपल्या धकाधकीच्या आयुष्यात स्ट्रेस वाढला आहे. पळण्यामुळे नोरेपाईनफ्राईनची मात्रा वाढते. हे संयुग आपल्या मेंदू व शरीराला एकताळ्यात ठेवते. पळण्यामुळे आपला आत्मविश्वास व आत्मसन्मान वाढतो.

(Image Credit : parentingchaos.com)

मूड सुधारतो :

तुमचा मूड जर खराब असेल तर लगेच घराबाहेर पडा आणि पळा. संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, पळण्यामुळे आपला मुड सुधारतो.

झोप चांगली येते :

आपल्याला किमान 7-8 तासांची झोप गरजेची असते. पळाल्यामुळे आपल्या झोपेचे वेळापत्रक व्यस्थित होते. नियमित पळाल्यामुळे चांगली झोप लागते.


Web Title: Amount of running for good health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.