काय आहे एनीमिया आणि काय असतात याची लक्षण? वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 02:57 PM2024-05-22T14:57:23+5:302024-05-22T14:57:44+5:30

अजूनही अनेकांना एनीमिया काय आहे किंवा त्याची लक्षण, कारणं काहीच माहीत नसतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

Anaemia symptoms, causes and the ways to prevent it | काय आहे एनीमिया आणि काय असतात याची लक्षण? वेळीच व्हा सावध!

काय आहे एनीमिया आणि काय असतात याची लक्षण? वेळीच व्हा सावध!

आयर्न आपल्या शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व आहे. जे आपल्या शरीरात अनेक महत्वाची काम करतं. आयर्न लाल रक्तपेशीमध्ये आढणाऱ्या हीमोग्लोबिन नावाच्या प्रोटीनचा भाग असतो, त्यामुळे हे तत्व फार महत्वाचं आहे. शरीरात जर आयर्नची कमतरता झाली तर एनीमियासारखी गंभीर समस्या होऊ शकते. पण अजूनही अनेकांना एनीमिया काय आहे किंवा त्याची लक्षण, कारणं काहीच माहीत नसतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

काय आहे एनीमिया?

एक्सपर्टनुसार, एनीमिया एक अशी स्थिती आहे. ज्यात शरीरातील टिश्यूपर्यंत ऑक्सीजन घेऊन जाण्यासाठी पुरेसे रेड ब्लड सेल्स किंवा हीमोग्लोबिनची कमतरता होते. हीमोग्लोबिन रेड ब्लड सेल्समध्ये आढळणारं एक प्रोटीन आहे. जे फुप्फुसातून शरीराच्या इतर अवयवांपर्यंत ऑक्सीजन पोहोचवतं. 

एनीमियाची लक्षण

- थकवा

- कमजोरी

- श्वास घेण्यास समस्या

- पिवळी त्वचा

- हृदयाचे ठोके नियमित नसणे

- चक्कर येणे

- छातीमध्ये वेदना

- पाय आणि हात थंड पडणे

- सतत डोकेदुखी

कसा कराल बचाव?

1) एनीमियाच्या वेगवेगळ्या प्रकारांना रोखणं अवघड आहे. पण आयर्न आणि व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या एनीमियापासून बचाव शक्य आहे. यासाठी तुम्ही पौष्टिक आहार घेणं महत्वाचं आहे.

2) आयर्न कमी झाल्याने होणाऱ्या एनीमियापासून बचाव करण्यासाठी आयर्न असलेले फूड्स जसे की, बीन्स, आयर्न असलेले धान्य, हिरव्या पालेभाज्या आणि ड्रायफ्रुट्स खाऊ शकता.

3) फोलेट हे एक असं तत्व आहे जे शरीरात आयर्न कमी होऊ देत नाही. अशात फोलिक अॅसिड असलेली फळं, फळांचा रस, हिरव्या पालेभाज्या, हिरवे वाटाणे, राजमा, शेंगदाणे, कडधान्य आणि तांदूळ इत्यादींचा नियमित आहारात समावेश करावा.

4) शरीराला व्हिटॅमिन सी मिळावं यासाठी तुम्ही आंबट फळं, ज्यूस, मिरची,  ब्रोकोली, टोमॅटो, खरबूज आणि स्ट्रॉबेरी नियमित खाऊ शकता. याने शरीराला आयर्न मिळण्यासही मदत होते.

Web Title: Anaemia symptoms, causes and the ways to prevent it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.