Health tips: शरीरातील रक्ताची कमतरता नाही सामान्य! वेळीच उपाय केले नाहीत तर होऊ शकतो 'हा' आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 10:18 AM2022-07-08T10:18:19+5:302022-07-08T10:25:58+5:30
शरीरात रक्ताची कमतरता असताना थकवा ते बेशुद्ध पडण्यापर्यंत विविध लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे योग्य वेळी ओळखली गेली तर ही समस्या गंभीर नसून त्यावर उपाय (Healthy Foods) करता येतात.
शरीरात रक्ताची कमतरता होणं ही एक सर्वसामान्य समस्या आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS) च्या अहवालानुसार, भारतातील ५८.६ टक्के मुले, ५३.२ टक्के मुली आणि ५०.४ टक्के गर्भवती महिलांना अॅनिमियाचा (रक्त कमी असणं) त्रास होतो. अशक्तपणा ही अशी स्थिती आहे जेव्हा शरीरातील लाल रक्तपेशींची संख्या एका ठराविक पातळीपर्यंत कमी होते. हेल्थलाइनच्या माहितीनुसार, शरीरात रक्ताची कमतरता असताना थकवा ते बेशुद्ध पडण्यापर्यंत विविध लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे योग्य वेळी ओळखली गेली तर ही समस्या गंभीर नसून त्यावर उपाय (Healthy Foods) करता येतात.
ही अशक्तपणाची लक्षणे आहेत -
- जेव्हा शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते, तेव्हा आपल्याला थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
- शरीरात रक्त कमी असतं तेव्हा ऑक्सिजनची कमतरता देखील जाणवते. यामुळे आपल्याला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
- रक्ताच्या कमतरतेमुळे संधिवात, कर्करोग, किडनीशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत आपली अॅनिमियासाठी चाचणी घेणे महत्त्वाचे आहे.
- डोकेदुखी आणि हात-पाय थंड पडणे हे देखील शरीरात रक्ताची कमतरता असल्याचे लक्षण आहे.
- त्वचा पिवळी पडणे, चेहरा किंवा पाय सुजणे हे देखील रक्ताच्या कमतरतेमुळे होते.
अशक्तपणा असल्यास काय खावे?
पालकमध्ये लोह असते. याच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. कोणाला अॅनिमियाचा त्रास होत असेल तर आपण आहारात टोमॅटो अवश्य खावे. रक्ताची कमतरता पूर्ण करण्यासाठी टोमॅटो ही अतिशय उपयुक्त गोष्ट आहे. तीळ, भोपळ्याच्या बिया, टरबूज, सूर्यफुलाच्या बिया, काजू आणि जवस शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करतात. अंडी, दूध, चीज, मांस, मासे, सोयाबीन, तांदूळ, हिरव्या पालेभाज्या शरीरातील रक्ताची कमतरता कमी करतात. याबाबत आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.